भीमा कोरेगाव विजयस्तंभा बाबत केलेल्या वादग्रस्त विधाना प्रकरणी करणी सेनेचा प्रमुख अजय सेंगर वर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा पीपल्स रिपब्लिकन पार्टीची मागणी
नगर प्रतिनिधी (दि.३०.डिसेंबर):-करणी सेनेचा प्रमुख’ अजय सेंगर याने भीमा कोरेगाव येथील ‘विजयस्तंभा’ बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल त्याच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे केली आहे.दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की करणी सेनेचा प्रमुख अजय सेंगर याने सोशल मिडियाच्या माध्यमातून “भिमा-कोरेगाव येथील विजयस्तंभा बद्दल शेअर केले की तो स्तंभ देशद्रोहाचा प्रतीक आहे.त्या विजय स्तंभावर बुलडोझर लावुन पाडुन टाका.व ५०० शूरविरांबद्दल सुद्धा बेताल वक्तव्य करून त्यांना देशद्रोही संबोधून त्यांचा ही अपमान केला आहे.त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.त्यामुळे त्याच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार अर्जाद्वारे मागणी केली आहे.यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड,प्रदेश संघटक सोमा शिंदे,संघा गायकवाड,दीपक सोनावणे,अक्षय बोरुडे,सिद्धांत गायकवाड,धम्मा गायकवाड इ.उपस्थित होते.