
राहुरी प्रतिनिधी:-अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस ठाण्यातील पथकाकडून घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी एक तरुणास नुकतेच अटक करण्यात आले आहे.

राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त बातमी मिळाली की बारगाव नांदूर गावातील शिवाजी चौकात एक इसम तलवार जवळ बाळगून फिरत आहे.या गोपनीय माहितीची शहानिशा करणे कामी व योग्य कारवाई करणे कामी पोनि.श्री.ठेंगे यांनी पथक नेमले असता या पथकास सुरज कृष्णा मंडलिक (रा. बारगाव नांदूर तालुका राहुरी) हा माहितीप्रमाणे तलवार बाळगताना मिळून आला.या इसमावर शस्त्र अधिनियम कलम 4 /25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार लक्ष्मण औटी हे करत आहे.हि कारवाई पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे,विभागीय पोलीस अधिकारी श्री.बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या सुचेनेने पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोल,ASI लक्ष्मण औटी,पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल यादव,पोलीस नाईक प्रवीण बागुल,पोलीस कॉन्स्टेबल ढाकणे,पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख,pc भगवान थोरात,pc नवले, यांच्या पथकाने केलेली आहे.