
अहमदनगर (दि.४ फेब्रुवारी):-विक्रीच्या उद्देशाने गावठी कट्टे बाळगणारे 02 इसम 62,000/- हजार रुपये किमतीच्या 2 गावठी कट्टे व 04 जिवंत काडतुसासह कापूरवाडी नागरदेवळे रोडवर जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांचा स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/दिनेश आहेर यांना शोध घेवुन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना पोनि/दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदाराकडून माहिती मिळाली की,दि.3 फेब्रुवारी रोजी इसम नामे विकास सुधाकर सरोदे व त्याचा साथीदार शेंडी बायपास या ठिकाणी इसम नामे ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट रा. नेवासा व त्याच्या साथीदारासह नागरदेवळे गावचे शिवारात कापुरवाडी गावाकडे जाणारे रोडवर गावठी कट्टे (अग्निशस्त्र) विकण्यासाठी येणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने पोनि/दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे दोन स्वंतत्र पथके नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आवश्यक सुचना देवुन पथके रवाना केली.
नमुद सुचनां प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदनगर ते छ. संभाजीनगर रोडवरील शेंडी बायपास या ठिकाणी सापळा लावुन आरोपी नामे विकास सुधाकर सरोदे (रा.गुंजाळे ता.राहुरी,जिल्हा अहमदनगर) यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये 01 गावठी बनावटीचा कट्टा (अग्निशस्त्र) व 02 जिवंत काडतुस मिळुन आले असुन त्याचा साथीदार नामे लखन सुधाकर सरोदे रा.गुंजाळे (ता. राहुरी,जि.अहमदनगर) हा सदर ठिकाणावरुन पळुन गेला आहे.दरम्यान मिळालेल्या बातमीतील ठिकाणी नागरदेवळे गावाचे शिवारात वारुळवाडी गावाकडे जाणारे रोडवरुन आरोपी नामे ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट (रा.मोरे चिंचोरा,ता.नेवासा, जिल्हा अहमदनगर) यास ताब्यात घेवुन त्याचे अंगझडतीमध्ये 01 गावठी बनावटीचा कट्टा (अग्निशस्त्र) व 02 जिवंत काडतुस मिळुन आले असुन त्याचा साथीदार नामे भैया शेख पुर्ण नांव गांव माहित नाही.
हा सदर ठिकाणावरुन पळुन गेला आहे.वरील दोन्ही ठिकाणावरुन आरोपी नामे विकास सुधाकर सरोदे व ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट यांचे कब्जामध्ये 02 गावठी बनावटीचे कट्टे (अग्निशस्त्रे) 04 जिवंत काडतुस असा एकुण 62,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द 1) एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे गु.र.नं. 111/2024 आर्म ऍ़क्ट कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे 2) भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गु.र.नं. 99/2024 आर्म ऍ़क्ट कायदा कलम 3/25,7 प्रमाणे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलिस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग श्री.संपत भोसले यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हेमंत थोरात,पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे,रविंद्र कर्डीले,अतुल लोटके,गणेश भिंगारदे,ज्ञानेश्वर शिंदे,संतोष लोढे,संदिप चव्हाण,संतोष खैरे,सागर ससाणे, बाळासाहेब गुंजाळ,प्रशांत राठोड,संभाजी कोतकर, प्रमोद जाधव,अरुण मोरे यांनी केलेली आहे.