Maharashtra247

नगर पाथर्डी रोडवर पत्याच्या क्लबवर भिंगार कॅम्प पोलिसांचा छापा

नगर प्रतिनिधी (दि.३०.डिसेंबर):-नगर पाथर्डी रोडवर भिंगार मधील भीमनगर कमानीच्या आडोशाला पत्र्याच्या शेडमध्ये चालू असलेल्या तिरट जुगारावर भिंगार कॅम्प पोलिसांनी दि.३० डिसेंबर रोजी रात्री १२.१५ वा. सुमारास धाड टाकून १,१७,१००( एक लाख सतरा हजार शंभर रुपये) रोख रक्कम जप्त करून एकूण सात जणांवर १)बापु सुर्यभान तोडमल वय 47 वर्षे जेऊर ता.जि.अहमदनगर २)सद्दाम सिकंदर खान वय 32 वर्षे रा.केडगाव बँक काँलनी,अहमदनगर ३) गिताराम मधुकर काळे वय 40 वर्षे रा.ब्राम्हण गल्ली,भिंगार ता.जि.अहमदनगर ४)आकाश बाबुराव दाणवे वय 32 वर्षे रा.प्रेमदान हडको ता.जि.अहमदनगर ५) माधव रखमा भोसले रा.नालेगाव ता.जि.अहमदनगर ६) मुकेश लक्ष्मण गोहेर रा.पंपींग स्टेशन,भिंगार ता.जि.अहमदनगर ७) फैजान रउफ शेख रा.गरीब नवाज काँलनी,पोना/राहुल राजेंद्र द्वारके यांच्या फिर्यादीवरून गुरन.६५६/२०२२ महा.जु.का.क.४,५, प्रमाणे भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख,पोहेकॉ/अजय नगरे,पोना/राहुल द्वारके,पोहेकॉ/गणेश जठार,पोकॉ/भागचंद लगड यांनी केली आहे.

You cannot copy content of this page