तब्बल दोघांवर मिळून पंधरा गुन्हे दाखल असलेले चैन स्नॅचिंग करणारे दोन सराईत आरोपी मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद
अहमदनगर प्रतिनिधी (दि.३०.डिसेंबर):-अहमदनगर जिल्हयात विविध पोलीस स्टेशनचे हद्यीत चैन स्नॅचिंग करणारे ०२ आरोपी १,०४,०००/- रु. (एक लाख चार हजार रुपये ) किंमतीचे ०२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिन्यासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.बातमीतील हकीगत अशी की,यातील फिर्यादी अर्पणा महेश कोडम (वय ४२ वर्षे,धंदा व्यवसाय, रा.घर.नं ४२५९ गौरी घुमट आनंदी बाजार,अहमदनगर) व त्यांचे पती रमेश केमीकल नावाचे दुकान बंद करुन घरी जात असताना कुष्टधाम समोर आले असता त्यांच्या पाठीमागुन येणा-या अनोळखी इसमाने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे गंठण ओढुन घेवुन निघुन गेला होता.वगैरे मजकुरचे फिर्यादीवरुन गुन्हा रजि.दाखल करण्यात आला आहे.सदरबाबत तोफखाना पो.स्टे.गुरनं १९३६/२०२२ भादवी कलम ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हयाचे तपासाबाबत श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक यांनी अहमदनगर जिल्हयामध्ये चैनस्नॅचिंगचे प्रकार वाढत असल्याने गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री.अनिल कटके,पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून गुन्ह्याचा सखोल व बारकाईने समांतर तपास करुन गुन्हयातील आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके यांनी चैन स्नॅचिंग गुन्हे उघडकीस आणणेकामी ०३ पथके तयार केली.पोलीस निरीक्षक अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा,अहमदनगर यांना माहिती मिळाली की, इसम नामे विकास गोंडाजी चव्हाण रा.अशोकनगर,ता.श्रीरामपुर याने त्याचे साथीदारासह महिलांचे गळयातील सोन्याचे दागिने ओढून चोरी केले असून तो हरेगांव फाटा,ता. श्रीरामपूर या ठिकाणी येणार असलेबाबत माहीती मिळाली. त्यावरुन श्रीरामपुर परिसरात पोलीस अंमलदारांसह पेट्रोलिंग करीत असलेले पोसई/सोपान गोरे,यांना मिळालेली माहिती सांगून तात्काळ सदर ठिकाणी जाऊन सापळा लावून कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने सफो/भाऊसाहेब काळे,बाळासाहेब मुळीक, पोहेकॉ/विजयकुमार बेठेकर, संदीप घोडके,पोना/शंकर चौधरी,ज्ञानेश्वर शिंदे,लक्ष्मण खोकले,संदीप दरंदले, रविकिरण सोनटक्के,पोकॉ/रणजित जाधव,विजय धनेधर,चापोहेकॉ/संभाजी कोतकर अशांनी मिळालेल्या माहितीचे ठिकाणी हरेगांव फाटा या ठिकाणी जाऊन सापळा लावून थांबले असता थोडयाच वेळात एक इसम पायी येताना दिसला.सापळा पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्याचा संशय आल्याने त्यास अचानक घेराव घालून पकडले.त्यास त्याचे नांव गाव विचारता त्याने त्याचे नांव विकास गोंडाजी चव्हाण (वय २८ वर्षे रा.अशोकनगर,ता. श्रीरामपुर) असे असल्याचे सांगितले त्यास विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने त्याचे साथिदारासह अहमदनगर शहरात महिलांचे गळयातील सोन्याचे दागिने ओढून चोरी केल्याचे कबुली देऊन सदरचे चोरी केलेले सोन्याचे दागिने हे त्याचा साथीदार कपील राजू पिंपळे (रा.कोळपेवाडी,ता.कोपरगांव)याचेकडे असून त्याने व मी असे चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करण्याकरीता नगर कोपरगांव रोड,पुणतांबा फाटा ता.कोपरगांव येथे थोडयाच वेळात येणार आहे. असे सांगितल्याने सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असात पुणतांबा फाटा या ठिकाणी विकास गोंडाजी चव्हाण याने त्याचा साथीदार दाखविला असता त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गांव विचारता त्याने त्याचे नांव कपील राजू पिंपळे (वय ३५ रा. कोळपेवाडी,ता. कोपरगांव) असे सांगितले त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात दोन तुटलेले सोन्याचे मंगळसूत्र १,०४,०००/- रु किमतीचे ०२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने मिळुन आले.त्याचेकडे चौकशी केली असता त्यांनी अहमदनगर शहरात पाईपलाईन रोड परिसरात महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिने चोरी केल्याचे कबुली दिली.त्यावरून अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी केली असता खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
(१) तोफखाना पो.स्टे. १९३६/२०२२ भादविक. ३९२, ३४(२) तोफखाना पो.स्टे. १९५१/२०२२ भादविक. ३९२, ३
वरील प्रमाणे ०२ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.सदर गुन्हयात जबरी चोरी झालेला मुद्देमाल कौशल्यपूर्ण तपासकरुन १,०४,०००/-रुपये किंमतीचे २ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.सदर आरोपी नामे (१) विकास गोंडाजी चव्हाण वय २८ वर्षे रा. अशोकनगर, ता. श्रीरामपुर याचे विरुध्द खालील प्रमाणे दरोडयाची तयारी, जबरी चोरीचे ०६ गुन्हे दाखल आहेत.
१) शिर्डी पो.स्टे. गुरनं ०६/२०१७ भादविक. ३९२.३४ प्रमाणे
२) श्रीरामपूर शहर पो.स्टे. गुरनं १५५ / २०१७ भादविक. ३९९, ४०२ प्रमाणे
३) शिर्डी पो.स्टे. गुरनं २३/२०१९ भादविक. ३९२, ३४ प्रमाणे
४) राहुरी पो.स्टे. गुरनं ३७८/२०१६ भादविक. ३९२, ३४ प्रमाणे
५) कोपरगांव शहर पो.स्टे. गुरनं ४३/२०१९ भादविक. ३९२, ३४ प्रमाणे
६) श्रीरामपूर शहर पो.स्टे. गुरनं ५०/२०१९ भादविक. ३९२, ३४ प्रमाणे
(२) कपील राजू पिंपळे वय ३५ रा. कोळपेवाडी, ता. कोपरगांव यांचेविरुध्द खालील प्रमाणे घरफोडया चो-या ” असे ०९ गुन्हे दाखल आहेत.
१) कोपरगांव तालुका पो.स्टे. गुरनं १७९ / २०२० भादविक. ३७९ प्रमाणे
२) कोपरगांव तालुका पो.स्टे. गुरनं ४०९/२०२० भादविक. ३७९, ३४ प्रमाणे
३) कोपरगांव तालुका पो.स्टे. गुरनं ४३३ / २०२० भादविक. ३७९,३४ प्रमाणे
४) कोपरगांव तालुका पो.स्टे. गुरनं ४३७ /२०२० भादविक. ३७९.३४
५) आदर्शनगर पो.स्टे. गुरनं ३३/२०१६ भादविक. ३९९, ४०२ प्रमाणे
६) कोपरगांव तालुका पो.स्टे. गुरनं १०३ / २०१९ भादविक. ४५७, ३८०, ४१४ प्रमाणे
७) कोपरगांव तालुका पो.स्टे. गुरनं ३० / २०२० भादविक. ४५७, ३८०, ३४ प्रमाणे
८) जळगांव तालुका पोलीस स्टेशन, (जि.जळगांव) गुरनं ५८ / २०१८ भादविक. ४५७, ३८०, ३४ प्रमाणे
९) जळगांव तालुका पोलीस स्टेशन, (जि. जळगांव) गुरनं ५९ / २०१८ भादविक. ४५७, ३८०, ३४ प्रमाणे वरील प्रमाणे गुन्हे दाखल असून कपील राजू पिंपळे हा (१) कोपरगांव तालुका पो.स्टे. गुरनं ४३३ / २०२० भादविक. ३७९,३४ प्रमाणे (२) कोपरगांव तालुका पो.स्टे. गुरनं १७९/ २०२० भादविक. ३७९ प्रमाणे या दोन गुन्हयामध्ये फरार आहे. इसम नामे (१) विकास गोंडाजी चव्हाण वय २८ वर्षे रा. अशोकनगर, ता. श्रीरामपुर (२) कपील राजू पिंपळे वय३५ रा. कोळपेवाडी,ता.कोपरगांव यांना पुढील कायदेशीर कारवाई करीता तोफखाना पोलीस ठाणे गुरनं ११३६ / २०२२ भादविक.३९२,३४ चे तपासकामी हजर केले आहे.सदरची कारवाई डॉ.श्री.बी.जी.शेखर पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र,नाशिक,श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर शहर विभाग, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.