अहमदनगर प्रतिनिधी (दि.३०.डिसेंबर):-अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या ७०व्य महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात मुंबई शहरने बाजी मारत अजिंक्यपद पटकावले.मुंबई शहर ने नगरला ३२ विरुद्ध ३१ असे एका गुणाने हरवले. अतिशय अतितटीचा हा सामना झाला.आमदार निलेश लंके,शिवसेना संपर्क प्रमुख आ.सुनील शिंदे तसेच इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजयी संघाला चषक प्रदान करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर नगर जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष आ. निलेश लंके,राज्य आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार,राज्य संघटनेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील,सेक्रेटरी शशिकांत गाडे,आजीव अध्यक्ष दादाभाऊ कळमकर, उपाध्यक्ष प्रकाश बोरुडे, उपाध्यक्ष जयंत वाघ, अहमदनगर महानगर पालिकेच्या महापौर सौ. रोहिणी शेंडगे,शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर अभिषेक कळमकर,युवा सेनेचे माजी नगरसेवक विक्रम राठोड, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ,नगरसेवक सचिन शिंदे,संतोष गेणाप्पा, कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू संगीता सोनावणे कोकाटे,शैला रायकर पेडणेकर,आशा गायकवाड, चव्हाण, राष्ट्रीय खेळाडू संध्या म्हात्रे,जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले,शोभा भगत शिंदे,विद्या पठारे हनवंते, आदी उपस्थित होते.नगर आणि मुंबई शहर दरम्यान झालेला अटीतटीचा अंतिम सामना २५ – २५ असा बरोबरीत होता.रेड पॉईंट्स मध्ये मुंबई आणि नगरमध्ये १५ – १५ अशी बरोबरी होती टॅकल पॉईंट्स मध्ये नगर १० गुण घेऊन पुढे होते.मुंबई शहर ने नगरला दोनदा ऑल आउट करून नगरवर लोन चढवले होते.तरी देखील हा सामना बरोबरीत होता . त्यानंतर पंचानी दोन्ही संघाना ५ – ५ चढायाचा सामना खेळण्यास सांगितले.४ चढायापर्यंत सामना बरोबरीत होता.पण नगर चा कप्तान शंकर गदई ने मुंबईच्या ओंकारला यश्वस्वी टॅकल केले आणि सामना फिरला त्यावेळी नगर तीस आणि मुंबई शहर २८ असा गुणफलक होता.तेव्हा नगर ने बोनस पॉईंट मिळवत एक गुण पटकावला.नगर ३० आणि मुंबई २८ असा स्कोर होत.नंतर पुन्हा सामना बरोबरीत आला.आणि गोल्डन रेड पर्यंत सामना गेला.त्यात टॉस जिंकून नगर ने गोल्डन रेड चा अवसर निवडला.त्यात मात्र मुंबई ने बाजी मारली.वाडिया पार्क मैदानावर २७ जानेवारी ते ३० जानेवारी असा कबड्डीचा थरार नगरकर यांनी अनुभवला.स्पर्धा संपल्यानंतर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
Trending Topics:
Trending
- जिल्ह्यात छुप्या मार्गाने फोफावलेल्या अवैध वाळू तस्करी विरोधात LCB ची धडक कारवाई..तब्बल ३० लाखांचा मुद्देमाल जप्त..
- RTO च्या पत्राला तहसीलदारांनी दाखवली केराची टोपली..! नियमबाह्य लाल अंबर दिवा अद्यापही सुरू मनसे पुन्हा आक्रमक
- चिंचोली ग्रामसभेत युवकाचा जोरदार थरार..! पाण्याच्या टाकीसह शालेय घोटाळ्यांचे पितळ उघडे;बड्या कार्यकर्त्यांची बोलती बंद करत दिला थेट १ महिन्याचा अल्टीमेटम!
- ३ बड्या गुटखा माफियांवर एलसीबी चा एकाच वेळी छापा..! कारवाईने गुटखा माफीयांचे धाबे दणाणले..
- रिक्षा संघटनेचा मोठा स्फोट..! स्क्रॅप रिक्षांमधून १२०० रुपयांची हप्तेखोरी;अहिल्यानगरमध्ये स्वातंत्र्यदिनी रिक्षा संघटना काळे झेंडे दाखवून पालकमंत्र्यांना घेराव घालणार!
- आद्यनृत्यांगना नामचंद पवळा भालेराव यांच्या १५६ व्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन..सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन,गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
- अहिल्यानगर हादरले! मुकुंदनगरमधील खुनाचा थरार;गुन्हा करून पळालेल्या 3 आरोपींना पोलिसांनी हैद्राबादमधून उचलले! २४ तासांत ‘एलसीबी’ची धडक कारवाई
- कराड हादरले..! इतिहासात पहिल्यांदाच घडला ‘तो’ धक्कादायक प्रकार..बेजबाबदार कुत्र्याच्या मालकावर थेट FIR दाखल!