त्रस्त शेतकऱ्यांची कृषीपंपासाठी पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा करण्याची मागणी;निवेदनाची तात्काळ दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीतपणे देऊ सहाय्यक अभियंता बेदरकर यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
संगमनेर (नितीन भालेराव):-संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा सबस्टेशन अंतर्गत हिवरगाव पावसा,निमगाव टेंभी,व परिसरात कृषीपंपाचा वीज पुरवठा पूर्णवेळ पूर्ण क्षमतेने मिळत नाही.ओव्हर लोड मुळे जंप तुटणे,लाईट कमी सोडली जाणे इ.अनेक कारणाने कृषी पंपाची लाईट सलगरित्या १० ते १५ मिनिटे चालू रहात नाही.त्यामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी म.फुले,डॉ.आंबेडकर,राजर्षी शाहू विचारमंचा मार्फत सहाय्यक अभियंता यांना निवेदन दिले.
तसेच कृषी पंपाचा वीज पुरवठा पूर्ण वेळ पूर्ण क्षमतेने मिळण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करणे,नवीन ट्रान्सफार्मरची मागणी महावितरण कडे केली.मा.फुले,डॉ.आंबेडकर, राजर्षी शाहू विचारमंच या संस्थेने त्रस्त शेतकऱ्यांची दाखल घेत,संस्थेचे सचिव नितीनचंद्र भालेराव यांनी शेतकऱ्यांच्या समवेत सहाय्यक अभियंता बेदरकर यांची भेट घेतली.हिवरगाव पावसा,निमगाव टेंभी,व परिसरात कृषी पंपाचा वीज पुरवठा पूर्ण वेळ पूर्ण क्षमतेने मिळत नाही.
ओव्हर लोड मुळे जंप तुटणे,लाईट कमी सोडली जाणे यामुळे मोटारी जाळण्याचे प्रमाण वाढले तसेच घरगुती यंत्रे नादुरुस्त होतात.शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.सहाय्यक अभियंता बेदरकर यांना त्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सांगितल्या.कृषी पंपाचा वीज पुरवठा पूर्ण वेळ पूर्ण क्षमतेने मिळण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करणे,नवीन ट्रान्सफार्मरची मागणी महावितरणकडे केली आहे.त्या प्रसंगी सहाय्यक अभियंता बेदरकर यांनी डोळसणे येथील नवीन मुख्य लाईनचे वनविभागाच्या हद्दीतील काम रखडले आहे.त्यासाठी आवश्यक शासकीय परवानग्या मिळवाव्या लागतील.सदरच्या लाईनचे काम पूर्ण झाल्यास वीज पुरवठा अधिक क्षमतेने मिळण्यास मदत होईल. हिवरगाव पावसा सबस्टेशन येथे लोड शिल्लक नाही,मेन लाईन जुनी झाली आहे.आशा परिस्थितीत नवीन पावर बँक उपलब्ध करण्यात आली आहे ती कार्यांन्वित झाली कि कृषी पंपाचा वीज पुरवठा सुरळीतपणे सुरु होईल असे आश्वासन सहाय्यक अभियंता बेदरकर यांनी दिले.
हे निवेदन देण्यासाठी सरपंच सुभाष गडाख,राजहंस दुध संघाचे संचालक डॉ.प्रमोद पावसे,संस्थेचे सचिव नितीनचंद्र भालेराव,वृक्षमित्र प्रा.गणपत पावसे,शिवसेना तालुका उपप्रमुख भीमाशंकर पावसे,डॉ.संदीप पावसे,डॉ.रमेश पावसे,प्रगतीशील शेतकरी अनिल गडाख,सुधाकर पावसे,रामनाथ पावसे,संजय पावसे,दत्तू पावसे,बाबासाहेब गडाख,लतीफ पठाण,फत्तू पठाण,नामदेव गडाख,धनंजय पावसे,अल्ताफ पठाण,अलका भालेराव, नबाब पठाण यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.