जिल्हाधिकारी कार्यालयात वकील संरक्षण कायद्यासाठी निघालेल्या मोर्चात वकील बांधव येताच जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट बंद;गेटबंद असल्याने वकील संघटना आक्रमक पोलिसांशी बाचाबाची
अहमदनगर (दि.९ फेब्रुवारी):-राहुरी शहरातील वकील आढाव दाम्पत्याचे अपहरण करून निर्घृण खून केल्याच्या निषेधार्थ जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने आज दि.९ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
यात आमदार संग्राम जगताप सहभागी झाले होते.त्यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची भेट घेत जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांवर पोलिसांनी धाडसी कारवाई करण्याची खरी गरज आहे तसेच वकील दाम्पत्याच्या हत्येचा खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवावा तसेच सरकारी वकील म्हणून ॲड.उज्वल निकम यांची नियुक्ती करावी,तसेच लवकरच वकिलांचा प्रलंबित असलेला वकील संरक्षण कायदा मंजूर करण्यासाठी अधिवेशनात लेखी स्वरूपाचा प्रश्न उपस्थित करणार आहे.
सराईत गुन्हेगारांवर यापूर्वींच पोलिसांनी कारवाया केल्या असत्या तर अशा स्वरूपाच्या घटना घडल्या नसत्या,समाजविघातक लोकांना कायद्याचा धाक दाखवणे गरजेचे आहे, याघटनेचा निषेध करत वकिलांच्या तीव्र भावना शासन दरबारी मांडणारअसून तुम्ही जिल्ह्यांचे प्रमुख असून या घटनेचा अहवाल शासनाकडे पाठवावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली.जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट उघडत नसल्याने आंदोलन करते वकिल व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली काही वेळा हा परिसर तणावग्रस्त झाला होता.