
बुलडाणा (प्रतिनिधी):-बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे बहुजन समाज पार्टीची दि.११ फेब्रुवारी रोजी बैठक घेण्यात आली.या बैठकीमध्ये विधानसभा मतदारसंघ बांधणीवर सखोल चर्चा करण्यात आली.या बैठकीत बुलडाणा बहुजन समाज पार्टी महिला जिल्हाउपाध्यक्षपदी तसेच मेहकर विधानसभा प्रभारी म्हणून प्रा.सारिका गवई यांची नुकतीच निवड करण्यात आली.त्या ज्योतिबा फुले,छत्रपती शाहू,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला मानणाऱ्या आहेत.
प्रा.सरिका गवई या उच्चशिक्षित पीएचडी झालेल्या असून त्या राजकीय, सामाजिक,शैक्षणिक तथा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कायम अग्रेसर असतात.त्यांच्या या समाजकार्याची दखल घेऊन बहुजन समाज पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा संघमित्रा कस्तुरे यांनी त्यांची नियुक्ती केली.
यावेळी बसपा जिल्हा महासचिव तथा मेहकर विधानसभा प्रभारी श्री.दिलीप सरकटे,श्री.हिम्मतराव जाधव सिंदखेडराजा विधानसभा प्रभारी,श्री.प्रकाश सरदार,श्री.भिमराव इंगळे स व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.बसपा महीला जिल्हाध्यक्षा संघमित्रा कस्तुरे यांनी नूतन जिल्हा उपाध्यक्षा प्रा.सारिका गवई यांचे अभिनंदन केले तसेच त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.