
संगमनेर (नितीनचंद्र भालेराव):-भारतीय जनता पार्टीचे संगमनेर तालुकाध्यक्ष वैभवराव लांडगे यांनी नविन जम्बो सर्वसमावेशक कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली.या कार्यकारिणीत गणेश दवंगे यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.सामाजिक कार्यकर्ते गणेश दवंगे संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील रहिवासी आहेत तसेच ते अर्थमुव्हार्स व्यवसाया बरोबर सामाजिक,धार्मिक कार्यात कायम अग्रेसर असतात.
देवगड देवस्थानच्या विविध कार्यक्रमात त्यांचा नेहमी सहभाग असतो.भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते असल्याने त्यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.भाजपाच्या संघटन बांधणीच्या अनेक उपक्रमात ते सक्रिय सहभागी असतात,पक्षाने सोपविलेल्या जबाबदाऱ्या निस्वार्थ व प्रामाणिकपणे त्यांनी पार पाडल्या आहेत.केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असतात.
मोठा जनसंपर्क उत्तम संघटन कौशल्य असल्याने तरुणांचे मोठे संघटन केले आहे.देवगड देवस्थानच्या विविध कार्यक्रमात नेहमी अग्रेसर असतात.यात्रा उत्सवाचे नियोजन,व्यवस्थापन कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग असतो.हिवरगाव पावसा व परिसरातील तसेच तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अधिक भर दिला आहे.त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.त्यांच्या निवडीने हिवरगाव पावसा गावात एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्याचे महसूल,दुग्धव्यवसाय,पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे-पाटील,खासदार डॉ.सुजय दादा विखे पाटील,भाजयुमो प्रदेश सचिव ॲड .श्रीराज डेरे,जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे,तालुकाध्यक्ष वैभवराव लांडगे,शहराध्यक्ष ॲड. श्रीरामभाऊ गणपुले,संगमनेर विधानसभा प्रमुख सतीष कानवडे, संजय गांधी निराधार योजना समिती तालुकाध्यक्ष अमोल खताळ, जिल्हा उपाध्यक्ष अशोक कानवडे,माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे,डॉ अशोक इथापे, केशव दवंगे व तालुका जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या निवडी बद्दल अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.