
अहमदनगर (दि.१२ फेब्रुवारी):-भिंगार पोलीस स्टेशनच्या हद्दीत नागरदेवळे गावात धारदार तलवार बाळगणा-या विरुध्द कॅम्प पोलीसांनी कारवाई करून त्यास जेरबंद केले आहे.
भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सपोनि/योगेश राजगुरु यांना गोपनिय माहीती मिळाली की, नागरदेवळे येथे एक इसम दहशत करुन हातात धारदार तलवार अवैध्यरित्या घेऊन फिरत आहे.आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहीती प्राप्त झाल्याने सपोनी/राजगुरु यांनी तात्काळ भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार व बीट मार्शलचे अंमलदार यांना बातमीतील नमुद ठिकाणी जाऊन खात्री करुन कारवाई करण्याचे आदेशित केल्याने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार व बीट मार्शल चे अंमलदार यांनी बातमीतील नमुद ठिकाणी जाऊन सापळा रचुन सदर इसम हा पळुन जान्याच्या तयारीत असताना त्यास व त्याचे हातातील धारदार तलवार शिताफीने ताब्यात घेऊन सदर इसमास त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सोहेल चॉद शेख (रा नागरदेवळे ता.जि. अहमदनगर) असे असल्याचे सांगीतल्याने त्या इसमा विरुध्द कॅम्प पोस्टे गुरंन 124/2024 आर्म अॅक्ट 4/25 मपोकाक 110/117 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उप विभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांच्या सूचनेनुसार सफो/कैलास सोनार,सफौ/रेवननाथ दहिफळे,पोहेकॉ/दिपक शिंदे, पोहेकॉ/गणेश साठे,पोकॉ/ अमोल आव्हाड,पोकॉ/संदीप थोरात यांनी केली आहे.