
अहमदनगर (दि.१३ फेब्रुवारी):-नगर शहरातील झेंडीगेट परिसरातील कारी मस्जिदजवळ बंद पडलेल्या सार्वजनिक शौचालय जवळ एका बंद खोलीत सुरु असलेल्या कत्तलखान्यावर कोतवाली पोलिसांच्या पथकाने छापा टाकून तब्बल ६०० किलो गोमांस,तीन मालवाहू गाड्या,दोन लोखंडी सत्तुर,बारा गोवंशिय जनावरे, तीन म्हैसवर्गीय जनावरे असा २० लाख ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस अंमलदार सुरज कदम यांच्या फिर्यादीवरून अरबाज खलील शेख,फैजल अस्लम शेख,सलीम शब्बीर कुरेशी,फैजान अब्दुल कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.झेंडीगेट परिसरातील कारी मस्जिद जवळ बंद पडलेल्या सार्वजनिक शौचालय जवळ एका बंद खोलीत कत्तलखाना सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने छापा टाकला असता तेथे गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू असल्याचे दिसून आले.पोलिसांनी तेथून सहाशे किलो गोमांस,तीन मालवाहू गाड्या,दोन लोखंडी सत्तुर, बारा गोवंशय जनावरे,तीन म्हैसवर्गीय जनावरे असा वीस लाख ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,पोलीस उपनिरीक्षक/गजेंद्र इंगळे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाटील, दिपक रोहोकले,सत्यजित शिंदे,तानाजी पवार,सुरज कदम, सोमनाथ केकान, शिवाजी मोरे,महेश पवार,अभय कदम,अमोल गाडे,संकेत धीवर यांनी केली आहे.