
अहमदनगर (दि.१६ फेब्रुवारी):-कोपरगाव तालुक्यातील देर्डे-को-हाळे शिवार परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह त्याचे ४ साथीदारांची टोळी १० लाख ८३ हजार ४००/- रुपये किंमतीचे साधनासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोठे यश आले आहे.
बातमीची हकिगत अशी की जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.दिनेश आहेर यांना गंभीर स्वरुपाचे ना उघड गुन्हे उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि/आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून गुन्हे उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.पथक आरोपींची माहिती काढत असताना सपोनि/श्री. हेमंत थोरात यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,इसम नामे मयुर उर्फ भुऱ्या गायकवाड रा. कोपरगांव हा त्याचे ६ ते ७ साथीदारासह २ कारमधुन येवुन शिर्डी ते नाशिक जाणारे रोडवर,देर्डे फाट्याजवळ, साईनाथ शेर ए पंजाब हॉटेलजवळ,देर्डे-कोऱ्हाळे शिवारात दरोडा घालण्याचे तयारीत आहेत.
अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने,सपोनि/थोरात यांनी प्राप्त माहिती पथकास देवुन,पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत कळविल्याने पथकाने लागलीच बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री केली असता शिर्डी ते नाशिक जाणारे रोडवर,देर्डे फाट्याजवळ,साईनाथ शेर ए पंजाब हॉटेलजवळ,देर्डे – कोऱ्हाळे शिवारात रोडचे कडेला २ चार चाकी गाड्या अंधारात लावुन काही इसम अंधारामध्ये बसलेले दिसुन आले.त्यावेळी पथकाची खात्री झाल्याने त्या ठिकाणी पथकाने अचानक छापा टाकताच दोन इसम पथकास पाहुन अंधारामध्ये पळुन गेले. त्यांचा पाठलाग केला असता ते मिळुन आले नाही.उर्वरीत अंधारात बसलेले संशयीत इसम पळण्याचे तयारीत असतांना त्यांना ताब्यात घेवुन,पथकाची ओळख समजावुन सांगुन सदर ठिकाणी थांबण्याचे कारणाबाबत विचारपुस करता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.त्यावेळी त्यांना त्यांची नावे गांवे विचारता त्यांनी त्यांची नावे 1)मयुर उर्फ भुऱ्या अनिल गायकवाड रा.इंदिरानगर,ता.कोपरगांव, 2) अमोल उर्फ ऋतुंजय अविनाश कुंदे रा. एकरुखे,ता.राहाता,3) समाधान देविदास राठोड रा. करंजी बोलकी,ता. कोपरगांव, 4)संदीप पुंजा बनकर रा.द्वारकानगर रोड, शिर्डी,ता.राहाता व 5)उमेश तानाजी वायदंडे रा. गणेशनगर,ता.राहाता असे असल्याचे सांगितले. त्यांचे कडे पळुन गेलेल्या इसमांबाबत विचारपुस करता त्यांनी पळुन गेलेल्या इसमांची नावे 6)गणेश भिकुनाथ तेलोरे रा.गणेशनगर,ता.राहाता (फरार) व 7) राहुल शिवाजी शिदोरे (फरार) रा. गोकुळनगर,कोपरगांव,ता. कोपरगांव असे सांगितले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची पंचा समक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडती व कब्जात 1 तलवार,1 कटावणी,1 कत्ती, 1 लाकडी दांडके,मिरचीपुड, 1 ऍ़पल व 3 विविध कंपनीचे मोबाईल फोन,1 इर्टीगा व 1 वोल्क्सवॅगन कार असा एकुण 10,83,400/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 41/2024 भादविक 399, 402 सह आर्म ऍ़क्ट 4/25 प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुभर्मे श्रीरामपूर विभाग,उपविभागीय पोलीस अधिकारी,शिर्डी विभाग श्री. शिरीष वमने यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सपोनि/श्री.हेमंत थोरात,अंमलदार बाळासाहेब मुळीक,रविंद्र कर्डीले,दत्तात्रय गव्हाणे, सचिन अडबल,विश्वास बेरड, ज्ञानेश्वर शिंदे,देवेंद्र शेलार, अतुल लोटके,संतोष खैरे, विजय ठोंबरे,फुनकान शेख, बाळासाहेब गुंजाळ,शिवाजी ढाकणे,किशोर शिरसाठ, प्रमोद जाधव,प्रशांत राठोड व चंद्रकांत कुसळकर यांनी केलेली आहे.