
अहमदनगर (दि.१७ फेब्रुवारी):-१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा होत असल्याने या कालावधीत भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हृददीत सार्वजनिक शांतता,कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल त्या अनुषंघाने क्रिमीनल प्रोसिजर कोड कलम 144 (2) प्रमाणे अहमदनगर शहराच्या भौगोलिक हृददीमध्ये भिंगार कॅम्प पोस्टे हददीतील एकुन 76 गुन्हेगारांना प्रवेश बंदी केल्या बाबतचा आदेश सुधीर पाटील उपविभागीय दंडाधिकारी,नगर भाग,अहमदनगर यांनी पारित केला आहे.