
अहमदनगर (दि.१६ फेब्रुवारी):-इन्स्टाग्रामवर गावठी कट्टयाची रिल्स् टाकणारा अल्पवयीन इसम व त्याचा साथीदाराला गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्र व हत्यारे बाळगणा-या इसमांची स्थानिक गुन्हे शाखेचे पथक माहिती घेत असताना दि.१६ फेब्रुवारी २०२४ रोजी इन्स्टाग्रामवर फिल्मी स्टाईलने हातात गावठी कट्टा घेवून फिरणा-या इसमाची रिल्स प्रसारीत झाली होती. इन्स्टाग्राम रिल्सची तांत्रिकविश्लेषणाचे आधारे खात्री केली असता ही रिल्स खरी असल्याचे निदर्शनास आल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पथक नेमून इन्स्टाग्राम रिल्स मधील इसमाचा शोध घेणे कामी आवश्यक सुचना देवुन पथकस रवाना केले.
स्थागुशाचे पथक इन्स्टाग्रामवरील इसमाची सोनई परिसरात शोध घेत असतांना स्थागुशा पथकास गुप्तबातमीदारा मार्फत रिल्स बनवणारा इसम घोडेगांव ते मिरी जाणारे रोडवर,मांडे मोरगव्हाण शिवारात, कानिफनाथ मंदीरा जवळ त्याचे साथीदारासह गावटी कट्टा व जिवंत काडतुस विक्री करीता येणार असल्याची माहिती प्राप्त झाली.त्यानुसार पथकाने बातमीतील ठिकाणी घोडेगांव ते मिरी जाणारे रोडवर,मांडेगव्हाण शिवारातील,कानिफनाथ मंदीरा जवळ सापळा लावून मिलिद जालींदर मरकड (मांडे मोरगव्हाण,ता.नेवासा) व एक विधिसंघर्षी बालक (रा. गजानन कॉलनी) यांना ताब्यात घेतले.ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांचे अंगझडतीत ३०,०००/- रुपये किंमतीचा गावठी बनावटीचा १कट्टा (अग्नीशस्त्र ) व ५००/- रुपये किंमतीचे १ जिवंत काडतुस असा एकुण ३०,५००/-रुपये किंमतीचा मुदेदेमाल मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द सोनई पोलीस स्टेशन येथे आर्म अक्ट ३/२५, ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आाहे.
हि कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलूबरमे श्रीरामपूर व उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग श्री.सुनिल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार रवींद्र कर्डिले,ज्ञानेश्वर शिंदे,गणेश भिंगारदे,रणजित जाधव, रोहित मिसाळ,अतूल लोटके, देवंद्र शेलार,संतोष खेरे, विजय ठोबरे,प्रशांत राठोड यांनी केलेली आहे.