
अहमदनगर (दि.१६ फेब्रुवारी):-दि.22/12/2023 रोजी घटनेतील फिर्यादी रामेश्वर सुधाकर ढवळे (रा. वडगांव बुद्रुक जि.पुणे) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की,दि. 22/12/2023 रोजी रात्रीच्या सुमारास मोटारसायकलवरुन विजयलाईन चौकाच्या मार्गे पाथर्डीच्या दिशेने जात असतांना डीओ मोपेड गाडीवरील तीन अज्ञात इसमांनी बळजबरीने फिर्यादीचा सॅमसंग कंपनीचा 20,000/-रु किंमतीचा मोबाईल फोन हा बळजबरीने ओढून घेवुन गेले आहेत.
या फिर्यादीवरुन कॅम्प पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर 807/2023 भादवि कलम 392,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल झाल्यापासुन आरोपी हे फरार होते.भिंगार पोलीस स्टेशनचे सपोनि/योगेश राजगुरु यांना गोपनिय माहीती मिळाली की,या गुन्हयातील फरार दोन सशंयित इसम हे विजयलाईन चौकात येणार आहेत अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने सपोनि/राजगुरु यांनी तात्काळ भिगार पोस्टेचे तपास पथकातील अंमलदारांना सदर नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन संशयित इसमांना ताब्यत घेण्याबाबतचे आदेश दिल्याने तपास पथकातील अंमलदारांनी सदर ठिकाणी जावुन सापळा लावून दोन इसमांन ताब्यात घेवुन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नाव किरण सुरेश चावरे (रा.श्रीराम कॉलनी,भिंगार अहमदनगर) व एक विधीसंघर्षीत बालक असे असल्याचे सांगीतल्याने त्यांना विश्वासात घेवुन गुन्हयांचे अनुषंघाने चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवाउडविची उत्तरे दिली तसेच त्यांना अधिक विश्वासात घेवृन पुन्हा चौकशी करता दोघांनी सदरचा गुन्हा हा त्यांचे आणखी एका साथीदारांच्या मदतीने केला असल्याचे कबुल केले असुन किरण चावरे याचे कड़न गुन्हयातील चोरुन नेलेला 20,000/- किंचा मोबाईल फोन हा जप्त करण्यात आला असुन गुन्हयाचा अधिक तपास पोसई/अमोल बोरसे हे करत आहेत.
हि कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगरसेवक विभाग अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/ योगेश राजगुरु यांच्या सूचनेनुसार पोसई/अमोल बोरसे,पोलीस अंमलदार संदिप घोडके,दिपक शिंदे, समीर शेख,अमोल आव्हाड, संदिप थोरात,कैलास शिरसाठ,कांतीलाल चव्हाण, दक्षिण मोबाईल सेलचे राहूल गुंड़ यांच्या यांनी केली आहे.