
अहमदनगर (दि.१६ फेब्रुवारी):-नगर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना नुकतीच समोर आली आहे.नराधम दाजीने आपल्या सख्या अल्पवयीन मेव्हणीशी जबरदस्ती करून शारीरिक संबंध ठेवले.
हि घटना ५ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०२४ रोजी घडली असून दि.१६ फेब्रुवारी रोजी अल्पवयीन पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात नईम मुन्ना खान याच्या विरोधात बलात्कारासह पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास तोफखाना पोलिस ठाण्याचे सपोनि/नितीन रणदिवे करीत आहेत.