
अहमदनगर (दि.१६ फेब्रुवारी):-शेंडी गावातील लोकनियुक्त सरपंच प्रयागा प्रकाश लोंढे यांना गावातील काही लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली होती.गावातील कचरा टाकण्याकरीता खड्डा करण्याच्या वादातून हा प्रकार घडला होता.
नेटके वस्ती येथे गावातील कचरा टाकण्याकरीता खड्डा खोदण्याचे काम सुरू असताना त्या ठिकाणी रावु नेटके,बॉबी नेटके,राणा नेटके,दिपक नेटके,अतुल नेटके,गणेश ससाणे यांनी येऊन सरपंच लोंढे यांना मारहाण करत शिवीगाळ केली तसेच लज्जास्पद वर्तन केले या नंतर सरपंच लोंढे यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
त्यांच्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात भा.द.वी कलम 354,324,323,427,504,143,147,148,149 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.एमआयडीसी पोलिसांनी सपोनी/माणिक चौधरी यांच्या सूचनेनुसार तपास करून राऊत रावसाहेब यादव नेटके व गणेश गोरख ससाने यांना अटक केली आहे.हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण विभाग संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या सूचनेनुसार पोउपनि/योगेश चाहेर,पोहे/थोरवे,पोहेकॉ/राजेंद्र सुद्रिक, पोकॉ/किशोर जाधव,पोकॉ/जयसिंग शिंदे,पोकॉ/भगवान वंजारी,पोकॉ/सुरज देशमुख, नवनाथ दहिफळे,नंदकुमार सांगळे यांनी केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक योगेश चाहेर करीत आहेत.