
संगमनेर (नितीनचंद्र भालेराव):-संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील सबस्टेशन लगत असलेला ट्रान्सफार्मर ओव्हर लोडमुळे जळाला.सदर ट्रान्सफार्मर वरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वस्ती,गडाख वस्ती,पठाण वस्ती,वाकचौरे वस्तीसह कृषी पंपधारकांना वीज पुरवठा केला जातो.
वातावरणातील बदल,कमी पाणी कमी क्षमतेने होणारा वीज पुरवठा यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला असताना,सदरचा ट्रान्सफार्मर नादुरुस्त होऊन जळाला. मात्र सहाय्यक अभियंता बेदरकर तसेच संगमनेर महावितरणच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा कार्यतत्परतेमुळे ट्रान्सफार्मर तातडीने उपलब्ध करण्यात आला.
ट्रान्सफार्मर जाळल्यामुळे त्रस्त शेतकऱ्यांची समस्या मा.फुले,डॉ.आंबेडकर,राजर्षी शाहू विचारमंचा मार्फत सहाय्यक अभियंता यांना माहिती दिली.हिवरगाव पावसा येथील सब स्टेशन सहाय्यक अभियंता बेदरकर यांनी वरिष्ठ अधिकार्यांना संपर्क साधला.बाभळेश्वर येथून ट्रान्सफार्मर तातडीने उपलब्ध करण्यात आला.तो ट्रान्सफार्मर महावितरण कर्मचार्यांनी व्यवस्थितरित्या बसविला,परंतु सदरचा ट्रान्सफार्मर बसविल्या नंतर चाचणी चालू असताना तोही जळाला.त्याची माहिती महावितरण कर्मचारी यांनी सहाय्यक अभियंता बेदरकर यांना दिली.सहाय्यक अभियंता बेदरकर यांनी तातडीने वरिष्ठ अधिकार्यांना पुन्हा संपर्क साधून महावितरण मार्फत दुसरा ट्रान्सफार्मर उपलब्ध करून दिला.हिवरगाव पावसा येथील सबस्टेशन लागत असलेला ट्रान्सफार्मर वरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वस्ती,गडाख वस्ती,पठाण वस्ती,वाकचौरे वस्तीतील शेतकऱ्यांची पिके जळण्याच्या मार्गावर असताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले ट्रान्सफार्मर जळाला की,शेतकऱ्यांचे शेती,जनावरांच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल होतात.अस्मानी व सुलतानी संकटाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीला मा.फुले,डॉ.आंबेडकर,राजर्षी शाहू विचारमंच हि संस्था धावून आली.
तसचे सहाय्यक अभियंता बेदरकर हे कार्यालयीन जबाबदारी बरोबर,त्यांच्या प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षपणा कार्यतत्परतेची हिवरगाव पावसा पंचक्रोशीत व संगमनेर तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.ट्रान्सफार्मर तातडीने उपलब्ध करणे कमी संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव, सहाय्यक अभियंता बेदरकर यांच्या सह महावितरणचे अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य मिळाल्याची माहिती संस्थेचे सचिव नितीनचंद्र भालेराव यांनी दिली.