
अहमदनगर (दि.२९ फेब्रुवारी):-अहमदनगर जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन जाधव यांच्यावर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणी 376, 376(2)(एन) 315, 323, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे सहकारी म्हणून सचिन जाधव यांची ओळख आहे.नगर शहरातील एका महिलेने त्यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची फिर्याद नोंदवली आहे त्यानुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.माजी नगरसेवक ते थेट शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून त्यांनी राजकारणात मोठी झेप घेतली होती मात्र त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.