
अहमदनगर (दि.२ मार्च):-एमआयडीसी परीसरात टपरीच्या आडोशाला जुगार खेळणा-या ४ इसमावर कारवाई करून ८५ हजार ३५०/-रु.चा मुददेमाल जप्त करण्यात एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि/ माणिक चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एमआयडीसी परीसरात एका टपरीचे आडोशाला काही इसम विनापरवाना पैसे लावुन तिरट नावाचा जुगार खेळवत आहेत.अशी बातमी मिळाल्याने सपोनि/चौधरी यांनी पोलीस स्टेशनचे पथक तयार करुन त्या ठिकाणी जावुन छापा टाकला,तिरट खेळणा-या इसमांना जागीच पकडुन त्यांना त्यांची नावे गावे विचारले असता त्यांनी त्यांचे नावे बाळु चंद्रकांत चितळे,बाळासाहेब संपत भोर,कुलदीप बाळु राठोड, रमेश जयराम जंगम असे सांगीतले.
त्यांचे कडुन एकुण ८५ हजार ३५०/-रुपयाचा मुददेमाल व तिरट खेळाची साधने जप्त केली आहेत.हि कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.संपतराव भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सपोनि/माणिक चौधरी,पोसई/मनोज मोढे, पोहेकॉ/नंदकिशोर सांगळे, पोहेकॉ/राजेंद्र सुद्रीक,पोकॉ/ किशोर जाधव,पोकॉ/नवनाथ दहिफळे,पोकॉ/उमेश शेरकर चापोहेकॉ/गिरवले यांनी केली आहे.