
अहमदनगर (दि.८ मार्च):-महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागासवर्गीय जाती कल्याण, शारीरिक व मानसिक दृष्ट्या अपंग,कुष्ठरोगी वगैरेसाठी तसेच समाज कल्याण क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचा गौरव करावा सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असलेल्या समाज सेवकांच्या कामाची दाद घ्यावी व इतर कार्यकर्त्यांना त्यापासून प्रेरणा मिळावी जेणेकरून सामाजिक उत्थानासाठी कार्यकर्ते सरसावून पुढे यावेत यासाठी शासनाने सन १९७१-७२ पासून त्या व्यक्तींसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार समाजभूषण पुरस्कार योजना सुरू केलेली आहे.
याच योजनेतून अहमदनगर जिल्ह्यात सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले महानगरपालिकेचे जल अभियंता परिमल निकम यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.अहमदनगर महानगरपालिकेत सेवा बजावताना परिमल निकम यांनी गोरगरीब नागरीकांना प्रथमता मदत करणे,तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर राहणे तसेच अहमदनगर जिल्ह्यातील फुले शाहू आंबेडकरी चळवळ पुढे नेण्यासाठी त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे.
त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अहमदनगरची मान पुन्हा एकदा उंचावली आहे.व त्यांना पुढील भावी वाटचालीस परिसरातील नागरिकांनी व जिल्ह्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.