
अहमदनगर (दि.९ मार्च):-जबरी चोरीतील फरार आरोपीला पकडण्यात भिंगार कँम्प पोलीसांना यश आले आहे.दि.22/12/2023 रोजी घटनेतील फियादी नामे रामेश्वर सुधाकर ढवळे (रा. वडगांव बुद्रक जि.पुणे) यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात हजर होउन फिर्याद दिली की,दि. 22/12/22023 रोजी रात्रीच्या सुमारास त्यांचे मोटारसायकलवरुन विजयलाईन चौकाच्या मार्गाने पाथर्डीच्या दिशेने जात असतांना डीओ मोपेड गाडीवरील तीन अज्ञात इसमांनी बळजबरीने फिर्यादी कडील सॅमसंग कंपनीचा 20.000/-रु किंमतीचा मोबाईल फोन हा बळजबरीने घेवुन गेले आहेत.
या मजकुरच्या फिर्यादी वरुन कॅम्प पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर 807/2023 भादवि कलम 392,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.गुन्हा केल्यापासुन आरोपी फरार होता.भिंगार पोलीस स्टेशनचे सपोनि/ योगेश राजगुरु यांना गोपनिय माहीती मिळाली की, सदर गुन्हयातील फरार इसम हा त्याचे राहते घरी येणार आहे. अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने सपोनि/राजगुरु यांनी तात्काळ भिंगार पोस्टेचे तपास पथकातील अंमलदारांना त्याचे राहते घरी जावुन सापळा लावुन सदर इसमास ताब्यात घेवुनकारवाई करण्याचे आदेशीत केल्याने तपास पथकातील अंमलदारांनी त्याचे घराजवळ सापळा लावुन थांबलेले असतांना पोलीस पथकाची त्यास चाहुल लागताच तो पळून जात असतांना पोलीस पथकातील अंमलदारांनी त्यास शिताफिने पाठलाग करुन ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव फरदिन खलील शेख (रा.मुलानी गल्ली,भिंगार) अहमदनगर असे असल्याचे सांगीतले त्यास विश्वासात घेवुन त्याय गुन्हयाचे अनुषंधाने चौकशीकरता त्याने प्रथम उडवाउडविची उत्तरे दिली त्यास अधिक विश्वासात घेवुन पुन्हा चौकशी करता त्याने गुन्हा केल्याचेकबुल केले आहे.
सदर गुन्हयाचा अधिक तपास पोसई/मनोज महाजन हे करत आहेत.सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधिक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली श्री.योगेश राजगुरु सहा.पोलीस निरीक्षक,पोसई/ मनोज महाजन,पोलीस अंमलदार संदिप घोडके, दिपक शिंदे,समीर शेख,अमोल आव्हाड,संदिप थोरात,कैलास शिरसाठ, कांतीलाल चव्हाण यांनी केली आहे.