
मुंबई (प्रतिनिधी):-बृहन्मुंबई महानगरपालिका आणि संत शिरोमणी रोहिदास समन्वय समिती यांचा संत रविदास समाज भूषण पुरस्कार चर्मकार समाजाच्या व सामाजिक चळवळीतील झुंजार आणि आक्रमक व्यक्तीमत्व असणाऱ्या समाजसेविका मुंबई येथील रहिवासी तसेच आपल्या सामाजिक कार्यातून जनमानसात ठसा उमटवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या प्रियंकाताई गजरे यांना जगतगुरू संत रोहिदास महाराज यांच्या जयंती महोत्सवानिमित्त संत रोहिदास समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

सौ. प्रियंका गजरे या चर्मकार समाजासाठी गौरवास्पद आहेतच परंतु कोणत्याही किर्तीची अपेक्षा न बाळगता साधेपणाने कर्तव्यनिष्टेने संत रोहिदास महाराजांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.तसेच समाजासाठी त्या तन मन धनाने झटत आहेत.
त्यांनी केलेल्या या कार्याची ही जणू एक पावतीच आहे म्हणून त्यांना यंदाचा मुंबई महापालिकेतर्फे देण्यात येणारा संत रोहिदास समाज भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे.यावेळी खा.राहुल शेवाळे,मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह बहल, चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर,मा.नगरसेविका आशाताई मराठे,संत कक्कया विकास संस्थेचे सचिव राजेश खंदारे,समाजसेवक अंकुश हजारे,समाजसेवक सुभाष मराठे व समाज बांधव इत्यादी उपस्थित होते.सौ.गजरे यांना मिळालेल्या या पुरस्काराने समाज बांधव व महिला वर्गात एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.