
मुंबई प्रतिनिधी (प्रियंका गजरे):-अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांना सामाजिक न्याय व सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या संत रविदास महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
असंख्य चर्मकार समाज बांधवांचे आधारस्तंभ,कैवारी,हितकरी समाज्यासाठी अहोरात्र झटणारे व्यक्तिमत्व,सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सर्व गुणसंपन्न असणारे,चर्मकार बांधव यांना विकसित,न्यायहक्क सन्मान मिळून देणारे समाजासाठी अहोरात्र कष्ट घेणारे म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे.श्री.खामकर यांनी केलेल्या समाजकार्याची जणू एक पुरस्काराच्या रूपाने त्यांना एक पावतीच आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मा.नगरसेविका आशाताई मराठे,समाजसेवक सुभाष मराठी,संत रोहिदास समाज भूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या सामाजिक कार्यकर्ते प्रियंका गजरे या उपस्थित होत्या.श्री.खामकर यांना संत रविदास महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने त्यांच्यावर अहमदनगर जिल्ह्यातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून समाज बांधवांच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.