
अहमदनगर (दि.१४ मार्च):-अहमदनगर पोलीस दलात बेलवंडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या मपोना/सुरेखा वलवे यांना राज्यस्तरीय लोकसेवा गौरव पुरस्काराने पुणे येथे रविवार १५ मार्च रोजी सन्मानित करण्यात येणार आहे अहमदनगर पोलीस दलासाठी ही गौरवास्पद बाब आहे.
स्वप्निल फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्काराने गौरविले जाते.त्याचाच एक भाग म्हणून मपोना/सौ.वलवे मॅडम यांची राज्यस्तरीय लोकसेवा गौरव पुरस्कारासाठी निवड झाली आहे.पुणे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे स्टेशन या ठिकाणी शुक्रवार दि.१५ मार्च रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह व मेडल आहे अशी माहिती स्वप्नल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.शोभा चंद्रकांत बल्लाळ यांनी दिली.सौ.सुरेखा वलवे यांची पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल जिल्हा पोलीस दलाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.