
अहमदनगर (दि.१४ मार्च):-अहमदनगर शहरात ॲपल मोबाईलच्या बनावट ऍ़क्सेसरी विक्री करणाऱ्या ६ दुकानावर छापे टाकुन तब्बल 37 लाख 62 हजार 369/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
बातमीची हकिगत अशी की,दि.14 मार्च 2024 रोजी जी.आय.पी.एस.प्रा.लि.मुंबई या कंपनीचे मुख्य तपासी अधिकारी श्री.कुंदन गुलाबराव बेलोशे (रा.ज्ञानदेव म्हात्रे चाळ,चाळ नंबर 01, रुम नंबर 03,खडेगोळवली, विठ्ठलवाडी,पुर्व कल्याण) यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांना समक्ष भेटुन नगर शहरातील वाडीया पार्क कॉम्प्लेक्स येथील मोबाईल दुकानामध्ये ॲपल कंपनीचे नावाचा वापर करुन ॲपल कंपनीचा लोगो असलेली बनावट ऍ़क्सेसरी विक्री होत असलेबाबत माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना प्राप्त माहिती कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.
नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करुन जी.आय.पी.एस.प्रा.लि. कंपनीचे तज्ञ अधिकारी व पंचांना सोबत घेवुन वाडीया पार्क कॉम्प्लेक्समध्ये जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथकास तात्काळ रवाना केले.पथकाने वाडीया पार्क कॉम्प्लेक्स मध्ये जावुन खात्री केली असता सदर ठिकाणी माँ चामुण्डा मोबाईल कवर,ग्लास होलसेल विक्रेता या दुकानामध्ये इसम नामे हिमताराम वालारामजी चौधरी रा.ओम कॉलनी, नानाजी नगर,रामदेव बाबा मंदीराजवळ,औसरकरमळा हा 13,50,967/- रुपये किमतीचा,व्हाईस टेलिकॉम मोबाईल ऍ़क्सेसरीज या दुकानामध्ये इसम नामे धनराज चंद्रकांत डेंगळे रा. आनंदनगर,रुपेश सुराण पुर्ण नांव माहित नाही.रा.लातुर, हल्ली रा.आनंदनगर (फरार) हे 14,82,900/- रुपये किमतीचा,शिवसहारा मोबाईल ऍ़क्सेसरीज,स्पेअर पार्ट,ऍ़ण्ड टुल्स होलसेल या दुकानामध्ये इसम नामे संपत ममताजी पालवे रा.मिरी,ता.पाथर्डी,जि.अहमदनगर हा 3,06,830/- रुपये किमतीचा मुद्देमाल,नवकार ऍ़क्सेसरीज मोबाईल रिपेअरींग ऍ़ण्ड ट्रेनिंग सेंटर या दुकानामध्ये इसम नामे साहिल विजय शिंदे रा.ताराबाग कॉलनी,केडगांव,शुभम शिवाजी तोगे रा.मिरी,ता. पाथर्डी,प्रतिक सुभाष गुगळे रा.मिरी ता.पाथर्डी,हल्ली रा. सारसनगर (फरार) हे 5,35,099/- रुपये किमतीचा,आनंद भक्ती मोबाईल ऍ़क्सेसरीज ऍ़ण्ड होलसेल्स या दुकानामध्ये इसम नामे अजय रसिकलाल बाफना रा.भवानीनगर, मार्केटयार्ड शेजारी हा 59,700/- रुपये किमतीचा, जय श्री कृष्ण मोबाईल होलसेल मोबाईल ऍ़क्सेसरीज या दुकानामध्ये इसम नामे यश किशोर खत्ती रा. पारशाखुंट,हलवाई गल्ली,हा 26,900/- रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांचे कडे ऍ़पल कंपनीकडील कोणत्याही प्रकारचा अधिकृत परवाना नसतांना Apple Inc. कंपनीचे लोगोचा वापर करुन बनावट चार्जर,केबल्स, एअरपॉड,मोबाईल कव्हर, बॅटरी,स्क्रिन गार्ड,ऍ़डॉप्टर, चार्जींग स्ट्रीप,सिम ट्रे,बॅक ग्लास पॅनल असे विक्री करण्याचे उद्देशाने वरील ६ दुकानामध्ये मिळुन आले.
ताब्यात घेण्यात आलेल्या 07 इसमांकडुन 37,62,369/- रुपये किमतीचा ऍ़पल कंपनीचा बनावट मुद्देमाल जप्त करुन त्यांचे विरुध्द कंपनीचे मुख्य तपासी अधिकारी श्री.कुंदन गुलाबराव बेलोशे यांचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 325/2024 प्रतिलिपी अधिकार अधि.1957 (सुधारीत अधि.1984 आणि 1994) कलम 51,63 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे.हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे साहेब,श्री. अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/तुषार धाकराव,पोलीस अंमलदार संदीप पवार,मनोहर गोसावी,रविंद्र कर्डीले,संतोष खैरे,गणेश भिंगारदे,अतुल लोटके,विजय ठोंबरे,शिवाजी ढाकणे,रविंद्र घुंगासे,बाळासाहेब गुंजाळ,आकाश काळे,किशोर शिरसाठ,सागर ससाणे,रणजीत जाधव यांनी केलेली आहे.