
अहमदनगर (दि.१५ मार्च):-राज्य उत्पादन शुल्क विभागाचे श्रीरामपूर तालुक्यातील भरारी पथक क्र.२ यांनी श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी,राहुरी तालुक्यातील वांबोरी ठिकाणी हातभट्टी गावठी दारू निर्मिती केंद्र व अवैध देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या ढाब्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने १३ मार्च रोजी मोहीम राबवून कारवाई केली आहे.
या कारवाईमध्ये एकूण ७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून ६१५० ली. कच्चे रसायन व ३०० ली. हातभट्टी दारू निर्मितीचे लोखंडी व प्लास्टिक बॅरल व इतर साहित्य नष्ट करण्यात आले. तसेच देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्या ढाब्यांवर छापे मारून २ लाख ३३ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या कारवायांमध्ये ९ आरोपींवर मुंबई दारूबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.यावेळी भरारी पथक क्रमांक २ श्रीरामपूर निरीक्षक अनुपकुमार देशमुख यांनी धाबे चालक व गावठी हातभट्टी दारू विक्रेत्यांना अवैधरित्या दारू विकल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशाराच दिला आहे.
हि कारवाई विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग श्री.सागर धोमकर,राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अहमदनगर श्री.प्रमोद सोनोने,उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर श्री.प्रवीणकुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर निरीक्षक श्री.अनुपकुमार देशमुख भरारी पथक क्रमांक २,दुय्यम निरीक्षक श्री.जी.एन.नायकोडी,दुय्यम निरीक्षक श्री.एस.एस.पवार,सहा.दुय्यम निरीक्षक श्री.के.के.शेख, सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री.एस.डी.साठे,जवान श्री. टी.आर.शेख व महिला जवान श्रीमती.एस.आर.फटांगरे,जवान श्री.एन.एम.शेख वाहन चालक यांनी सहभाग घेतला आहे.