
अहमदनगर (दि.१७ मार्च):-पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर दरोडा प्रकरणी ६ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करत पकडले असून यात एकुण १३ आरोपीचा समावेश आहे व या आरोपींनी सात गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
दि.१३ मार्च २०२४ रोजी घटनेतील फिर्यादी श्री. बाबासाहेब उत्तम ढाकणे (रा. अंबिका नगर,टाकळी मानूर, ता.पाथर्डी) हे त्यांच्या कुटूबिंयासह घरात झोपलेले असताना अंदाजे २० ते २५ वयाचे अनोळखी ८-९ इसमांनी घरात प्रवेश करुन फिर्यादी व त्यांचे कुटूबियांना लाथाबुक्यांनी मारहाण करुन, सत्तुरचा धाक दाखवुन घरातील ६६,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, रोख व विविध कंपनीचे मोबाईल फोन चोरुन नेले बाबत पाथर्डी पोलीस स्टेशन भादविक 395,397,504 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश आहेर यांना पथक नेमून गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री. आहेर यांनी स्वतः घटना ठिकाणास भेट देऊन ३ विशेष पथके तयार करुन पथकास आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.पथकाने घटना ठिकाणी भेट देवून आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत तसेच पाथर्डी परिसर व लगतचे बीड जिल्ह्यातील शिरुर कासार पोलीस स्टेशनला अशा प्रकारे दाखल असलेल्या गुन्हा ठिकाणी जावून फिर्यादी कडुन आरोपींचे वर्णन तसेच गेलेल्या मालाबाबत माहिती घेतली असता शिरुर कासार येथील गुन्ह्यात चोरी गेलेला मोबाईलचे व सदर घटना ठिकाणचे तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करत असतांना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुन्हा हा आरोपी नामे संदीप बबन बर्डे, (रा.वारणी,जिल्हा बीड) याने व त्याचे इतर १० ते १२ साथीदारांनी केला असुन ते पुन्हा कोठेतरी चोरी करण्यासाठी त्यांचे कडील पांढरे रंगाची पिकअप गाडीने पाथर्डी येथुन मोहटादेवी रोडने जाणार आहेत आता गेल्यास मिळुन येईल अशी गुप्तबातमीदाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री.आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास देवुन,खात्री करुन कारवाई करणे बाबत कळविल्याने पथकने लागलीच पाथर्डी ते मोहटादेवी जाणारे रोडवर कारेगांव फाटा,पाथर्डी येथे जावुन सापळा रचुन थांबलेले असताना बातमीतील वर्णना प्रमाणे पिकअप वाहन येताना दिसले.
खात्री होताच पथकाने ताब्यातील वाहने रोडला आडवी लावली असता पिकअप चालकाने त्याचे ताब्यातील गाडी थोड्या अंतरावर थांबविली.त्यावेळी पिकगाडीचे पाठीमागील हौदात बसलेल्या इसमांपैकी ३ इसम गाडीतुन उडी मारुन पळुन गेले.उर्वरीत पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी पिकअप गाडीचे केबिनमध्ये असलेले ३ व पाठीमागील हौदामध्ये बसलेले २ इसमांना ताब्यात घेवुन त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे आजिनाथ भागीनाथ पवार रा.आर्वी,ता. शिरुर कासार,जिल्हा बीड,गणेश रामनाथ पवार रा.ब्रम्हगव्हाण,ता.पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर,विनोद बबन बर्डे रा.वारणी,ता.शिरुर कासार, जिल्हा बीड,अविनाश काशिनाथ मेहेत्रे रा.कुळधरण रोड,कर्जत,ता.कर्जत,अमोल सुभाष मंजुळे रा.वडगांव पिंपरी,ता.कर्जत असे सांगितले.
त्यांना पळुन गेलेल्या इसमांचे नांव गांव विचारले असता इसम नामे विनोद बर्डे याने पळुन गेलेल्या इसमांची नावे संदीप बबन बर्डे रा. शिरुर कासार,जिल्हा बीड (फरार),पप्पु उर्फ राहुल दिलीप येवले,रा.शिरुर कासार,जिल्हा बीड (फरार),अक्षय सुरेश पवार रा. वडगांव तनपुरा,ता.कर्जत (फरार) असे असल्याचे सांगितले.त्यांचे कडे सदर गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्यांनी त्यांचे साथीदार नामे बाबासाहेब भवर रा. वडगांव, ता. पाथर्डी (फरार) विशाल जगन्नाथ मंजुळे रा. वडगांव तनपुरा,ता.कर्जत (फरार),भारत फुलमाळी रा. वारणी,ता.शिरुर कासार,जि. बीड (फरार),विकास उर्फ हरी पोपट सुळ रा.वडगांव तनपुरा, ता.कर्जत (फरार) यांचे सोबत गुन्हा केल्याची सांगुन साथीदार नामे तुकाराम धोंडीबा पवार,रा.पाथर्डी हा आम्हाला चोरी करणे करीता आगोदर बोलावुन घेवुन कोठे चोरी करायची ते ठिकाण दाखवतो व त्यानंतर आम्ही रात्रीचे वेळी जावुन चोरी करतो व चोरी केलेले सोने तुकाराम पवार याचे कडे दिल्यानंतर तो काही दिवसांनी त्याचे पैसे देतो असे सांगितल्याने त्याचा शोध घेता तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपींकडे टोळीने कोठे कोठे व किती गुन्हे केले याबाबत अधिक सखोल व बारकाईने विचारपुस करता वरील टोळीने मिळुन खालील प्रमाणे गुन्हे केल्याचे सांगितल्याने एकुण -७ गुन्हे उघडकिस आले आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडुन 28 ग्रॅम वजनाचे 1,68,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, 29,400/- रुपये रोख,20,000/- रुपये किंमतीचा मोबाईल फोन, 6,00,000/- रुपये किंमतीची पिकअप व 200/- रुपये किंमतीची हत्यारे असा एकुण 8,17,600/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने ताब्यातील आरोपींना पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 254/24 भादविक 395, 397, 504 या गुन्ह्याचे तपासकामी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे साहेब,श्री. सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हेमंत थोरात,पोउपनि/तुषार धाकराव,सोपान गोरे,मनोहर शेजवळ,पोलीस अंमलदार मनोहर गोसावी,रविंद्र कर्डीले, दत्तात्रय हिंगडे,बापुसाहेब फोलाणे,विशाल दळवी, पंकज व्यवहारे,अतुल लोटके, गणेश भिंगारदे,विजय ठोंबरे, संतोष खैरे,संदीप चव्हाण, राहुल सोळुंके,फुरकान शेख, मेघराज कोल्हे,प्रशांत राठोड, रोहित मिसाळ,अमृत आढाव, अमोल कोतकर,जालिंदर माने,रविंद्र घुगांसे,मच्छिंद्र बर्डे, भाऊसाहेब काळे,किशोर शिरसाठ,विशाल तनपुरे, उमाकांत गावडे,चंद्रकांत कुसळकर,भरत बुधवंत व अरुण मोरे पोलीस यांनी केलेली आहे.