
अहमदनगर (दि.१७ मार्च):-नगर शहरातील विविध भागातुन मोटारसायकल चोरी करणारा चोरटा तब्बल ४ लाख ५ हजार रु.किमतीच्या ६ मोटरसायकलसह तोफखाना पोलिसांनी जेरबंद केला आहे.तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये होणाच्या मोटारसायकल चोरी गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,एक इसम हा चोरीची मोटार सायकल विकण्यासाठी भिस्तबाग महालाजवळ येणार आहे.
त्यावर पो.नि.श्री.आनंद कोकरे यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांनी भिस्तबाग महालाजवळ सापळा रचून संशईत इसम नामे अनिकेत विजय पारखे (रा.उक्कलगांव,ता-श्रीरामपुर,जि-अहमदनगर) यास ताब्यात घेतले,सदर इसमाचे कब्जात मिळून आलेल्या पल्सर मोटारसाययकल बाबत त्याचे कडे विचारपुस केली असता त्याने सुरुवातीला उडवा उड़वीची उत्तरे दिल्याने त्यास विश्वासात घेवून अधिक चीकशी केली असता त्याने सदर मोटारसायकल शिलाविहार परिसरातून चोरी केल्याचे कबुल करुन त्याने अहमदनगर शहरातील विविध पारिसरातील चोरी केलेल्या मोटारसायकल त्याच्या कब्जातून १)बजाज कंपनीची १५० सी सी मोटरसायकल, २)हिरो कंपनीची एच.एफ डिलक्स मॉडेलची काळया रंगाची मोटरसायकल,३) काळया रंगाची होन्डा कंपनीची युनिकॉर्न मोटरसायकल ४)सिल्व्रर रंगाची सुझूकी कंपनीची अॅक्सेस मोटरसायकल ५) सिल्क्वर रंगाची सुझुकी कंपनीचीअॅक्सेस मोटरसायकल ६) एक काळ्या रंगाची होंन्डा कंपनीची युनिकॉर्न मोटरसायकल ७)पांढ-या रंगाची सुझकी कंपनीची अॅक्सेसमोटर सायकल अशा एकुण ४ लाख ५,०০০/-रू. कि.च्या मोटारसायकली त्याच्या कब्जातून जप्त करण्यात आल्या.
तोफखाना पोलीस स्टेशन येथील (१) गु.र.नं २५३/२०२४ भा.दं.वि.क ३७९, ३४ प्रमाणे (२) गु.र.नं ३१९/२०२४ भा. दं.वि.क ३७९ प्रमाणे (३) गु.र.नं २०७/२०२४ भा.दं.वि.क ३७९,३४ प्रमाणे असे तीन गुन्हे उघड झाले आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती नगर शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे यांच्या सूचनेनुसार पोउपनि.श्री.शेलेश पाटील,पोहेकॉ/दत्तात्रय जपे,अहमद इनामदार,भानुदास खेडकर,दिनेश मोरे,पोना/वसिम पठाण,संदिप धामणे,सुरज वाबळे,पोकॉ/सतिष त्रिभवन,शिरीष तरटे,सूमित गवळी,दत्तात्रय कोतकर,सतिष भवर,बाळासाहेब भापसे यांनी केली आहे.