
अहमदनगर (दि.२० मार्च):-नेप्ती रोड परिसरात पीडब्ल्यूडी वर्कशॉपच्या जवळील मोकळ्या जागेत तिरट जुगार अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी ता.१९ मार्च रोजी छापा टाकला असून या छाप्यात एकूण दहा जणांविरुद्ध गु.र.नं. 352/2024 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत ५,२३० रू.चा.मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ/शाहिद शेख करीत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगरशहर अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाच्या सपोनी/योगिता कोकाटे,पोहेकॉ/तनवीर शेख, शाहीद शेख,पोना/अविनाश वाकचौरे,पोकॉ/दिपक रोहोकले,तानाजी पवार, सत्यजित शिंदे,सुरज कदम, प्रमोद लहारे,अतुल काजळे, शिवाजी मोरे,सुजय हिवाळे, सोमनाथ केकाण,महेश पवार, अमोल गाडे यांनी केली आहे.
