
संगमनेर (बानोबी शेख):- संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीपात्रात अवैध वाळू उपसा दिवसाढवळ्या राजरोसपणे सुरू होता त्या अनुषंगाने पत्रकार सविता दिलीप भालेराव यांना बातमी मिळाल्याने ते त्या ठिकाणी बातमी कव्हरेज करीता गेले असता त्या ठिकाणी अवैध वाळू उपसा चालू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्या मुळे त्यांनी बेकायदेशीर वाळू उपसा करताना घेतलेली शूटिंग संगमनेरचे तलाठी आप्पा पोमल तोरणे यांच्यासह संबंधित अधिकारी यांना अवैध वाळू उपशाची माहिती देऊन त्या घरी गेल्या. याचा राग मनात धरून अवैध वाळू व्यवसायिक जावेद इसाक शेख,फारूख इसाक शेख व आप्पा वाघमारे यांनी महिला पत्रकार यांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली त्यांच्या अंगावर धावून आले त्याच रात्री उशिरापर्यंत आप्पा वाघमारे हा त्यांच्या राहत्या घरी येऊन जिवे मारण्याची धमकी देत व जोर जोरात ओरडुन तुला या गल्लीत राहु देणार नाही इतरांना जसे गावा बाहेर काढले तसेच तुला हाकलुन लावील अशी धमकी दिली.
अवैध वाळू उपसा करणारे हे सराइत गुन्हेगार आसून ते पोलीस रेकॉर्डवरील गुंडगिरी करणारी मंडळी आहेत शहर पोलिस ठाण्यात यांच्या वरती विविध गुन्हे दाखल आहेत.यातील महिला पत्रकार ह्या सामाजिक कार्य करणाऱ्या असून पत्रकार पण आहेत.अन्यायाला वाचा फोडण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून त्या सतत करत आहेत त्यांचे कर्तव्य निभावत असताना त्यांच्या वर केव्हाही हे लोक हल्ला करून त्यांना दुखापत करू शकतात या लोकांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी पत्रकार संघाच्या वतीने दिलेल्या निवेदनात विनंती करण्यात आलेली असून अन्यथा कारवाई न झाल्यास पत्रकार संघ आक्रमक भूमिका घेतल्या शिवाय राहणार नाही असेही म्हटले आहे.