
अहमदनगर (दि.२० मार्च):-राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची समन्वयक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
दक्षिण लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,भाजप,शिवसेना व महा युतीतील मित्रपक्ष,जिल्हा पालकमंत्री, आजी-माजी आमदार/खासदार सर्व जिल्हाध्यक्ष व प्रमुख मान्यवर यांच्याशी संपर्क करून महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार यंत्रणा व निवडणूक जास्तीत जास्त मताधिक्याने जिंकण्याच्या दृष्टीने बैठका घेऊन समन्वय करावा असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आ.संग्राम जगताप यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
