
अहमदनगर (दि.२२ मार्च):-नगर शहरातील खिस्तगली व मार्केटयार्ड परिसरात हवाला कार्यालयात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी करत गुजरातचे दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात दोन ठिकाणी कारवाई करून तब्बल ७२ लाखांची रोकड पकडली ही रोकड हवाल्याची असून या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पकडलेल्या दोघांची चौकशी सुरू होती त्यानंतर त्यांना कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याचे एलसीबी काढून सांगण्यात आले निवडणुकीचे धामधूम सुरू होताच शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.