
अहमदनगर (दि.२२ मार्च):-नगर तालुक्यात चिचोंडी पाटील येथील श्रीरामाच्या पादुकासह मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्या चोरट्यास नगर तालुका पोलिसांनी २४ तासाच्या आत जेरबंद करण्याची कारवाई केली आहे. बातमीची हकीकत अशी की,यातील फिर्यादी बाळासाहेब आनंदा बेल्हेकर, (धंदा पुजारी,रा.चिचोंडी पाटील,ता.जि.अहमदनगर) यांनी नगर तालुका पोलिसात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले होते की मी गावातील सोनार गल्ली येथील श्रीराम मंदीरामध्ये पुजारी काम करत आहे.दि.२० मार्च रोजी पहाटे 05.00 वा.पुजा करण्यासाठी मंदीरात गेलो असता मंदीराचा दरवाजा उघडा होता.
मंदीर कुलुप तुटलेल्या स्थितीत आढळले मंदीरातील श्रीरामाच्या मुर्ती समोरील लाकडी पादुका व दानपेटी अज्ञात व्यक्तीने चोरीच्या इराद्याने काढून नेलेली दिसली अशी फिर्याद दिली.फिर्याद दाखल झाल्यानंतर नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रल्हाद गीते यांना तत्काळ तपासाच्या सूचना दिल्या दिल्या होत्या.
त्या दृष्टीने तपास करत असताना सपोनि/प्रल्हाद गीते यांनी स्वतःपथकासह गावातील सर्व सीसीटीव्ही चेक करून तपासामध्ये कौशल्य दाखवून २४ तासाच्या आत आरोपी नामे महादेव बाळू माळी (रा. चिंचोडी पाटील) यास पकडले.त्यास ताब्यात घेऊन 1,000/-रु.किच्या श्रीराम देवाच्या लाकडी पादुका 2) 500/- सकिची एक स्टिलची दानपेटी 3)250/- रु. देणगीची रोख रक्कम अंदाजे… 1,750/- रुपये किमतीचा ऐवज नगर तालुका पोलिसांच्या पथकाने आरोपीकडून २४ तासाच्या आत जप्त करण्यात आला.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रल्हाद गीते,पोलीस अंमलदार शैलेश सरोदे,सोमनाथ वडणे, शिवाजी खरात यांनी केली आहे.