
अहमदनगर (दि.२२ मार्च):-मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ नगर शहरातील भाजप कार्यालया समोर आम आदमी पार्टीच्या वतीने घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.
यावेळी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान घोषणाबाजी नंतर भाजप कार्यालयात उपस्थित असलेले पदाधिकारी देखील कार्यालयातून खाली आले. त्यांनी देखील घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
दोन्हीही पार्टीचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी करू लागले एकमेकांच्या अंगावर धावून जायला लागले बराच चाललेला गोंधळ पाहून शहरातील कोतवाली पोलिसांनी येऊन हस्तक्षेप केला.