
अहमदनगर (दि.२२ मार्च):-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर तालुका पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवीत तालुक्यातील साकत व साकत गावचे शिवारात गावठी हातभट्टी चालकांवर सलग चार ठिकाणी छापे टाकून तब्बल १ लाख ६२,००० हजार रु.किमतीची गावठी दारूसह कच्चे रसायन नष्ट केले.
या कारवाईत महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) (फ) प्रमाणे ४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक/गांगुर्डे हे करत आहेत.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या सूचनेनुसार नगर तालुका सपोनि/प्रल्हाद गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस/उपनिरीक्षक गांगुर्डे,धुमाळ,शेख,खरात पालवे,भालसिंग,जायभाय, शिंदे,गोरे,बोराडे,खेडकर,शिरसाट यांनी केली आहे.