
अहमदनगर (दि.२२ मार्च):-आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नगर तालुक्यातील कापूरवाडी शिवारात विनापरवाना घराच्या आडोशाला गावठी हातभट्टी दारू तयार करून विक्री करणाऱ्या दोघांना पकडुन त्यांच्या ताब्यातून तब्बल १ लाख १९ हजार रुपयांची १०० लिटर गावठी दारू भिंगार कॅम्प पोलिसांनी जप्त केली आहे.
या आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (फ,क,ड,ई) नुसार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास भिंगार पोलीस करत आहेत.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनि/योगेश राजगुरू यांच्या सूचनेनुसार पोहेकॉ/अजय नगरे,गणेश साठे,बिभीषण दिवटे,रघुनाथ कुलांगे, रेवननाथ मिसाळ,बबन बेरड, उंडे यांनी केली आहे.