
अहमदनगर (दि.२२ मार्च):-एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोखर्डी गावामध्ये अवैधरित्या गांजा झाडाची लागवड करणाऱ्या इसमावर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत तब्बल ९२ हजार ५०० रुपये किमतीचा ३७ किलो गांजा जप्त केला आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि/माणिक चौधरी यांना गोपनिय माहिती मिळाली की,पोखर्डी गावामध्ये यादव नाना साबळे (रा.पोखर्डी ता.जि. अहमदनगर) याने अवैधरीत्या शेतामध्ये गांजाची लागवड केली आहे.अशी गोपनीय माहिती मिळाल्याने या घटनेबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग श्री.संपतराव भोसले यांना कळविले त्यांच्या आदेशाने सुपा पोलीस स्टेशनचे पोनि/अरुण आव्हाड व एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अमंलदार यांचे एक पथक तयार करुन या ठिकाणी पंचा समक्ष छापा टाकला असता पोखर्डी गावामध्ये शेतात गांज्याचे झाडाची लागवड केल्याचे मिळुन आले.
सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.संपतराव भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांचे मार्गदर्शानाखाली पोनि/अरुण आव्हाड प्रभारी अधिकारी सुपा पोलीस स्टेशन,सपोनि/माणिक चौधरी प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोसई/मनोज मोंढे,पोहेकॉ/ नितीन उगलमुगले,पोहेकॉ/नंदकिशोर सांगळे,पोहेकॉ राजु सुद्रिक,पोहेकॉ/कावरे, पोहेकॉ/काळे,पोना/महेश बोरुडे,चालक पोहेकॉ/ गिरवले,पोकॉ/किशोर जाधव, पोकॉ/नवनाथ दहिफळे, पोकॉ/जयसिंग शिंदे,पोकॉ/ उमेश शेरकर यांनी केली आहे.