
अहमदनगर (दि.२२ मार्च):-भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनि/योगेश राजगुरू यांना गोपनीय माहिती मिळाली की,भिंगार शहरात कमानी जवळ पत्र्याच्या शेडच्या आडोशाला काही इसम एकत्र बसून तिरट नावाचा हारजीतीचा जुगार खेळत आहे.
सपोनि/राजगुरू यांनी मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकातील अंमलदार यांना बातमीतील ठिकाणी जाऊन कारवाई करण्यात आदेशित केले.तपास पथकातील अंमलदार यांनी नमूद ठिकाणी छापा टाकला असता पाच इसम तिरट जुगार खेळताना आढळून आले त्यांना जागीच पकडून त्यांच्या ताब्यातून ९६ हजार ८०० रू. व मुद्देमाल जप्त करण्यात केला,सदरील पाच इसमानवर पोकॉ/कैलास शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनि/योगेश राजगुरू यांच्या सूचनेनुसार तपास पथकातील अंमलदार संदीप घोडके, दीपक शिंदे,संदीप थोरात,कैलास शिरसाठ यांनी केली आहे.