
श्रीरामपूर (प्रतिनिधी):-श्रीरामपूर मधील नवीन तहसील ऑफिसच्या कमानी जवळ गावठी कट्टा व दोन जिवंत राऊंडसह ३७,०००/- रु. किं.च्या मुद्देमालासह एका सराईत गुन्हेगारास अटक करण्यात श्रीरामपूर शहर पोलीसांना यश आले आहे.श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,नविन तहसील ऑफीस जवळील हुसेननगर कमानीजवळ,वार्ड नं.१,श्रीरामपूर येथे पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला एक इसम स्वतःचे कब्जात गावठी कट्टा जवळ बाळगुन उभा आहे.अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोनि.नितीन देशमुख यांनी तात्काळ तपास पथकास सदर ठिकाणी जावुन बातमीप्रमाणे खात्री करुन त्याचेवर कारवाई करा.
असा आदेश दिल्याने तपास पथकाने तात्काळ दोन पंचासह सदर ठिकाणी जावून खात्री केली असता एक पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला इसम हुसेननगर कमानीजवळ उभा दिसला,त्यास तपास पथकाची चाहुल लागताच तो पळुन जावु लागला असता त्यास तपास पथकाने पाटलाग करुन शिताफिने पकडुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव आदम उर्फ भैय्या युसुफ शहा (रा.काझीबाया रोड,वार्ड श्रीरामपूर) असे असल्याचे सांगितले,त्यास पोलीस व पंचांची ओळख सांगुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे डावे कंबरेला गावठी कट्टा व दोन राऊंड मिळुन आले.पकडलेल्या या आरोपीवर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं. 352/2024 भारतीय हत्यार कायदा कलम 3,25,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास परि. पोलीस उपनिरीक्षक/दिपक मेढे हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन निरीक्षक नितीन देशमुख यांच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके,परि.पोलीस उपनिरीक्षक/दिपक मेढे, पोना/रघुवीर कारखेले,पोकॉ/ राहुल नरवडे,पोकॉ/गौतम लगड,पोकॉ/रमिझराजा अत्तार,पोकॉ/संभाजी खरात, पोकॉ/अजित पटारे,पोकॉ/आकाश वाघमारे,मपोकॉ/ मिरा सरग यांनी केली आहे.