
नगर (दि.२४ मार्च):-पारनेर येथील पतसंस्थेचे शटर तोडून रोख रकमेची चोरी करणारे आरोपीना मुद्देमालासह जेरबंद करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.बातमीची हकिगत अशी की,दि.२२ फेब्रुवारी २०२४ रोजी फिर्यादी श्री.अर्जुन कारभारी चौधरी धंदा चेअरमन शिवराय ग्रामिण पतसंस्था,पारनेर (रा. संभाजीनगर,ता.पारनेर) हे चेअरमन असलेल्या शिवराय ग्रामिण पतसंस्थेचे कोणीतरी अज्ञात चोरट्याने शटर व आतील काचेच्या दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश करुन 40,000/- रुपये रोख रक्कम चोरुन नेले बाबत पारनेर पो.स्टे.गु.र.नं. 121/2024 भादविक 457, 380 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता.
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पथक नेमूण गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले होते.पथकाने घटना ठिकाणास भेट देवुन,घटना ठिकाणचे व आजु बाजूचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले व त्यामधील संशयीतांची गुप्तबातमीदारा मार्फत माहिती घेत असताना, पथकास पारनेर कांदा मार्केट येथे झारखंड राज्यातील हमाल आलेले असुन त्यांनी त्यांचे मुंबई येथील साथीदारासह वरील प्रमाणे गुन्हा केल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकने त्या अनुषंगाने पुढील तपास करुन संशयीत इसम नामे सईद नूरहसन शेख (रा.डोंगरी, मुंबई) हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले.
त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव सईद नुरहसन शेख हल्ली रा. सोलापुर स्ट्रीट हायवे शेजारी, डोंगरी,मुंबई मुळ रा. साहेबगंज राज्य झारखंड असे असल्याचे सांगितले. त्याचे कडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे इतर साथीदार नामे जोहर आलम असादअली शेख रा.कांदा मार्केट जवळ,ता.पारनेर व कल्लु ऊर्फ महंमद शेख रा. नवी मुंबई यांचे सोबत मिळुन गुन्हा केल्याचे सांगितल्याने पथकाने उर्वरीत आरोपींचा शोध घेता आरोपी नामे जोहर आलम असादअली शेख रा. कांदा मार्केट जवळ, ता. पारनेर हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले.
आरोपीचा साथीदार नामे कल्लु ऊर्फ महंमद शेख रा. नवी मुंबई (फरार) याचा शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही.ताब्यात घेतलेल्या आरोपींची पंचा समक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतील 30,000/- रुपये रोख रक्कम मिळुन आली सदर रोख रकमे बाबत विचारपुस करता आरोपींनी पतसंस्थेतून चोरी केलेली रक्कम असल्याचे सांगितल्याने आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेवुन पारनेर पो.स्टे.गु.र.नं. 121/2024 भादविक 457, 380 प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासकामी पारनेर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास पारनेर पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.संपत भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी,ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/समाधान भाटेवाल, अंमलदार भाऊसाहेब काळे, दत्तात्रय गव्हाणे,रविंद्र कर्डीले, संदीप दरंदले,देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे,सागर ससाणे, चंद्रकांत कुसळकर व अरुण मोरे गुन्हे यांनी केलेली आहे.