
अहमदनगर (दि.२५ मार्च):-प्राणघातक अग्निशस्त्र कब्जात बाळगुन गुन्हे करण्याचे उद्देशाने अमरधाम रोड येथे थांबलेला रेकॉर्डवरील गुन्हेगारास कोतवाली पोलीसांनी जेरबंद केले आहे.कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना खात्रीलायक मिळालेल्या माहितीनुसार माहीती पोनि/ दराडे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे सपोनि/योगिता कोकाटे व पोलीस स्टाफ यांना पंचासह नमुद ठिकाणी जावून कारवाई करणेबाबत आदेशीत केले.स.पो.नि.योगिता कोकाटे ह्या पोलीस स्टाफ व पंचासह चारचाकी वाहन तसेच काही पोलीस अंमलदार दुचाकी वाहनाने नमुद बातमीचे ठिकाणी दोन्ही बाजूने गेले असता तेथे पोलीसांना मिळालेल्या बातमी प्रमाणे अंधारात एक इसम हा संशयास्पद रित्या उभा राहुन येणारे जाणारे दुचाकी वाहन चालकांकडे लक्ष देत असलेला दिसला.
पोलीस व पंचाची खात्री होताच ठिक त्यास जागीच पकडीत असता तो पोलीसांचे तावडीतुन सुटण्याचा प्रयत्न करित होता. त्याने त्याचे उजवा हात कमरेच्या पाठीमागील बाजुला घेवुन तो कमरेला पॅन्ट मधून काहीतरी काढीत असल्याचे जाणवल्याने पोकॉ/दिपक रोहोकले,पोकॉ/प्रमोद लहारे यांनी त्याचे दोन्ही हात पॅक पकडले.पोहेकॉ/शाहीद शेख यांनी चपळाईने नमुद इसमाचे कमरेला पॅन्ट मध्ये खोसुन ठेवलेले हत्यार लोखंडी अग्शिशस्र काढले.पकडलेल्या इसमास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव राकेश राजु ठोकळ असे असल्याचे सांगितले.त्याचे कब्जात 30,000/- रु.कि.चे एक लोखंडी स्टील कलरचे गावठी बनावटीचे अग्निशस्र त्यास मुठीला खालचे बाजुने आत मॅगझीन1000/- रु.किं. चे दोन लहाण आकाराचे काडतुसे नमुद अग्रिशस्राचे मॅगझीन मध्ये मिळुन आलेले असा एकुन 31,000/- रु किं.चा मुद्देमाल मिळून आला.
स.पो.नि. योगिता कोकाटे यांनी पंचासमक्ष नमुद मुद्देमाल जप्त केला.नमुद इसमास पोलीस स्टेशनला त्याचे ताब्यात मिळालेल्या अग्निशस्रासह आणण्यात आले आहे.पोकॉ/शिवाजी मोरे यांचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 376/2024 शस्र अधिनियम 1959 चे कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा तपास स.पो.नि. योगिता कोकाटे ह्या करित आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,गुन्हे शोध पथकाचे सपोनिरी. योगीता कोकाटे,पो.हे.कॉ. तनवीर शेख,शाहीद शेख, संदिप पितळे,पो.ना. अविनाश वाकचौरे,म.पो.ना. संगिता बडे,पो.कॉ. दिपक रोहोकले,सत्यजित शिंदे, तानाजी पवार,प्रमोद लहारे, अतुल काजळे,सुरज कदम, सोमनाथ केकान,शिवाजी मोरे,महेश पवार,अमोल गाडे, सुजय हिवाळे यांनी केली आहे.