
नगर (दि.२५ मार्च):-नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथील सुनील लांडगे या इसमाने याने त्याची पत्नी लिलाबाई आणि दोन मु्ली यांच्या अंगावर रॉकेल टाकून घरातच जिवंत जाळल्याची घटना सोमवारी ता.२५ मार्च रोजी घडली आहे.
या घटनेने परिसरात तसेच तालुक्यात खळबळ उडाली असून आरोपी विरुद्ध नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहे.आरोपीने है निर्दयी कृत्य संशयाच्या कारणाने आणि दारूच्या नशेत केल्याची चर्चा आहे.दरम्यान दारूच्या नशेत असलेला आरोपी सुनील लांडगे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या घटनेत त्याची पत्नी लिलाबाई,मुलगी साक्षी व खुशी या तिघांचा जळून मृत्यू झाला आहे.
जे घर पेटवून दिले ते पत्र्याचे होते.ते जळून खाक झाले.आधीच उन्हाचा तडाखा व भडकलेली आग,तापलेले पत्रे यामुळे मृतदेह बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत होते.मात्र दुपारपर्यंत है मृतदेह बाहेर काढण्यात आले होते.अधिक तपास पोलिस करत आहेत.