
अहमदनगर (दि.२५ मार्च):-देवळाली प्रवरा गावचे लाडके व्यक्तिमत्व फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीतील युवा नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात यांच्या १ एप्रिल रोजी होणाऱ्या भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे बाजारतळ देवळाली प्रवरा येथे सुरेंद्रभाऊ थोरात मित्र मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आलेले आहे.
यावेळी भव्य नागरी हृदयरोग व अस्थिरोग मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.या शिबिरात हृदयरोग,हृदयविकार,उच्च रक्तदाब,ब्लड शुगर,ब्लड प्रेशर,ईसीजी,प्लस रेट,ऑक्सिजन लेव्हल,उंची व वजन,अस्थिरोगा संदर्भातील आजार,पाठ,कंबर,मणके,मागन,गुडघेदुःखी,इ.आजारांची तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी केली जाणार आहे.तसेच रोटरी क्लब राहुरी यांच्या मार्फत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे.
यावेळी गोरगरीब महिलांना साड्या वाटप,व्याख्यान यांचेही आयोजन मित्र मंडळाच्या वतीने केलेले आहे.या कार्यक्रमानंतर सर्व नागरिकांना व मान्यवरांना स्नेहभोजनाचेही आयोजन केलेले आहे,असे सुरेंद्र भाऊ थोरात मित्र मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.