
अहमदनगर (दि.२६ मार्च):-विक्रीस आणलेल्या गांजासह शेवगांव येथून आरोपीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आहे.बातमीची हकिगत अशी की,आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन त्यांचे विरुध्द कारवाई करणेबाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पथक शेवगांव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्दे करणा-या इसमांची माहिती काढत असतांना सपोनि/हेमंत थोरात यांना गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे सादीक शेख रा. नवीन बाजारतळ,ता.शेवगांव हा कब्जात गांजा बाळगुन त्याचे राहते घरी विक्री करतो अशी खात्रीशीर बातमी मिळाली.त्यानंतर पथकाने तात्काळ शेवगांव पो.स्टे.येथे जावुन पोनि/दिगंबर भदाने व स्टाफ तसेच पंच व साधने सोबत घेवुन छाप्याचे नियोजन केले.पथकाने लागलीच बातमीतील नमुद ठिकाणी नवीन बाजारतळ, शेवगांव येथे जावुन संशयीत नामे सादीक शेख याचे वास्तव्याबाबत माहिती घेवुन,त्याचे राहते घरा समोर जावुन खात्री करता सदर घरात एक इसम बसलेला दिसला.
त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव सादीक शेख,रा. नवीन बाजारतळ, ता. शेवगांव असे असल्याचे सांगितले. त्याचे घराची पंचा समक्ष झडती घेता त्याचे घरातील पांढरे रंगाचे कुलरमध्ये पांढ-या रंगाच्या गोणीत उग्र वास येत असलेला बिया बोंडे, काड्या पाने संलग्न असलेला पाला मिळुन आला.पथकाने पांढ-या रंगाच्या गोणीत मिळुन आलेला बिया बोंडे,काड्या पाने संलग्न असलेला पाला या बाबत विचारणा करता त्याने पांढ-या रंगाच्या पिशवीतील बिया बोंडे, काड्या पाने संलग्न असलेला पाला हा गांजा असुन विक्रीसाठी आणल्याचे त्याचे घरातील कुलरमध्ये गोणीत ठेवलेला 38,550/- रुपये किंमतीचा 3 किलो 980 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा मिळुन आल्याने तो हस्तगत करुन सदर बाबत आरोपी विरुध्द पोकॉ/1699 शिवाजी अशोक ढाकणे नेम.स्थानिक गुन्हे शाखा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं. 257/2024 गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन 1985 चे कलम 8 (क) सह 20 (ब) ii प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन हे करीत आहे.
सदरची कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी,शेवगांव विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार सपोनि/हेमंत थोरात,अंमलदार संतोष खैरे, शिवाजी ढाकणे,सागर ससाणे,रोहित येमुल, उमाकांत गावडे ,मपोकॉ/प्रियंका चेमटे यांनी केली आहे.