
संगमनेर (राजेंद्र मेढे):-संगमनेर तालुक्यातील सहा आणि अकोले तालुक्यातील एक अशा सात सराईत आरोपींना तीन जिल्ह्यांतून प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांच्या आदेशानुसार तडीपार करण्यात आले आहे.विनयभंग,जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव गोळा करणे,शिवीगाळ,दमदाटी व मारहाण करणे असे अनेक गुन्हे यांच्यावर दाखल आहेत.
अनिकेत गजानन मंडलिक रा. माळीवाडा,संगमनेर,संपत उर्फ प्रशांत शांताराम गागरे रा. कोळवाडे,संगमनेर,अकोले राजूर येथील संजय अदालतनाथ शुक्ला,वरद लक्ष्मण लोहकरे रा.संगमनेर, लाल्या उर्फ अल्ताफ शेख संगमनेर,सचिन म्हसकुले, अतुल कोल्हे,या सात जणांना हद्दपार केले आहे.
या कामगिरीत उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहराचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे,तालुक्याचे पोलिस निरीक्षक देवीदास ढुमणे,राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी केली आहे.