सोनई (प्रतिनिधी):-शिवस्वराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्था पुनद गाव यांच्या विद्यमाने सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा संस्थेचे अध्यक्ष संजय भाऊ वाघमारे,संस्थेचे सचिव ताईसाहेब वाघमारे,कार्याध्यक्ष बाळासाहेब शिरसाठ यांनी आयोजित केला होता.
या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हा उपाध्यक्ष विजय जगताप यांना मिळाल्यामुळे श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनीलगिरी महाराज यांच्या हस्ते शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर जिल्ह्यातील कामगार चळवळीतील नेते बाबा आरगडे हे होते.यावेळी बाहेरून आलेल्या अनेक पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा सन्मान सुनीलगिरी महाराज, संजय वाघमारे,ताईसाहेब वाघमारे,बाळासाहेब शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दलित चळवळीतील कार्यकर्ते संजय भाऊ वाल्हेकर यांनी केले या कार्यक्रमास दिलीप दादा शिंदे,सनी साळवे,सुरेश गायकवाड,सरोदे सर व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.