अहिल्यानगर (अहमदनगर):-अहमदनगर जिल्ह्यात अवैध जुगार व दारु विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत तब्बल १२ लाख ६० हजार ३५०/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून ७८ आरोपी ताब्यात घेतले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध देशी,विदेशी व गावठी हातभट्टी व अवैध जुगार चालकांविरुध्द कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
नमूद दिलेल्या आदेशाप्रमाणे श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची विविध पथके तयार करुन जिल्ह्यातील अवैध दारु व जुगार अशा अवैध धंद्यांची माहिती घेवुन कडक कारवाई करणे बाबत मार्गदर्शन केले त्या प्रमाणे पथकाने जिल्ह्यात कारवाई केली आहे.
हि कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.