
प्रतिनिधी:-जालना येथील विरेगाव मध्ये दि.५ फेब्रुवारी रोजी महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली यांची राष्ट्रीय निरीक्षक जयश्रीताई घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक उत्साहाने संपन्न झाली.
यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री.किसन काशीद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या संघटनेचे वटवृक्ष लवकरच वाढत चालले आहे तसेच जास्तीत जास्त महिलांनी या संघटनेत सहभागी व्हावे ज्यामुळे महिलांवर होणारे अन्याय अत्याचार थांबतील असे मत राष्ट्रीय निरीक्षक सौ.जयश्री ताई घावटे यांनी यावेळी व्यक्त केले.जालना उपाध्यक्ष सौ.संगीताताई गायके यांनी विरेगाव ग्रामपंचायत मध्ये महिलांसाठी एक छोटेखानी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमाला परिसरातील महिला वर्गांचा उदंड प्रतिसाद होता.या बैठकीला राष्ट्रीय निरीक्षक सौ.जयश्रीताई घावटे , मराठवाडा युवती अध्यक्ष डॉ.स्नेहल पुरी,जालना जिल्हा अध्यक्ष सौ.शालिनीताई पुरी,जालना उपाध्यक्ष सौ.संगीताताई गायके आणि गावातील महिला वर्गाचा अतिशय छान प्रकारे प्रतिसाद होता.